Sanjay Raut: संजय राऊत यांचा जामिन टिकणार की नाही?

आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले असले तरी या जामिनाला ईडीने विरोध केला आहे. ईडीने या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यामुळे आज, शुक्रवारी राऊतांचा जामिन टिकणार की नाही, यावर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब होणार आहे.

Sanjay Raut
Uddhav Thackeray: संजय राऊत ही आमची लांब पल्ल्याची तोफ

खरेतर परवाच्या सुनावणीत कोर्टाने ईडीला फटकारले होते. तुम्ही जाणीवपुर्वक त्रास देत आहात, तुम्ही नेते निवडले आहेत, पण आम्ही जर योग्य निर्णय दिला नाही तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असे न्यायालयाने मह्टले होते. आणि ईडीचे काहीही म्हणणे न ऐकता कोर्टाने संजय राऊत यांना जामिन मंजूर केला होता. त्यामुळेच आज उच्च न्यायालयात सुनावणीमध्ये ईडी काय युक्तीवाद करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ईडीने राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण कोर्टाच्या निर्णयाने ईडीला झटका बसला होता.

Sanjay Raut
Sanjay Raut: कोठडीतील दिवसाबद्दल राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कोर्टाने ईडीवर ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे सर्व स्तरातून ईडीवर टीकाही होऊ लागली होती. ईडी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यांवर चालत असल्याचा

मोदी, शहांना भेटणार

जामीनावर बाहेर येताच संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहीजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला असल्याचे राऊत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Surakshit Matritva Yojana
Nitesh Rane Acquitted
Sanjay Dutt Luxury Hotel In Goa
Tarun Tejpal Sexual Assault Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com