Maharashtra Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Maharashtra Crime News: महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली.

Manish Jadhav

Maharashtra Crime News: महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. गुरुवारी (3 सप्टेंबर) राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पोळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या भीषण आणि दुर्दैवी घटनेत अश्विनी यांच्यासह त्यांच्या तीन मुलांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अश्विनी यांना दोन वर्षांच्या जुळ्या मुली आणि पाच वर्षांचा एक मुलगा होता. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका गुणवान आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने क्रीडा क्षेत्रात मोठी खंत व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे माहेर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील आहे. त्यांचा विवाह उमरगा तालुक्यातील व्हान्टळ येथील रहिवासी असलेल्या कुटुंबात झाला होता. अश्विनी यांचे वडील आणि पेशाने शिक्षक असलेले तानाजी शिवाजी मोहिते यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरुन पोलिसांनी (Police) अश्विनी यांचे पती, सासू-सासरे आणि मावशी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला.

तपास अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जुळ्या मुलींच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून अश्विनी यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. तसेच लग्नाच्या वेळी माहेरुन पुरेसा हुंडा न आणल्याच्या कारणावरुनही त्यांचा सातत्याने छळ केला जात होता.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही निष्पन्न झाले की, अश्विनी यांचे पती आणि सासरचे नातेवाईक त्यांच्यावर माहेरुन सोन्याच्या बांगड्या आणि नवीन ऑटो रिक्षा खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी करत होते. या सततच्या छळाला आणि शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून अखेर नैराश्यात गेलेल्या अश्विनी यांनी आपल्या तीन निष्पाप मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन थेट खाली उडी घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 80 (हुंडाबळी), 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 85 (पती किंवा नातेवाईकांकडून महिलेशी क्रूरता) या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले असून, चौकशीसाठी पती आणि सासू-सासर्‍यांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT