Union Minister Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

'राष्ट्रवादीने मलिकांना सोडून दिले' नारायण राणेंचा घणाघात

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरणावरुन गाजत असताना राज्यातील राजकारणी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरणावरुन गाजत असताना राज्यातील राजकारणी नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आघाडी सरकरवर निशाणा साधला आहे.

राणे म्हणाले, देशामधील काही राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका झाल्या त्यामध्ये दादरा नगर हवेलीची एक जागा शिवसेनेने जिंकली. मात्र डेलकर निवडूण आल्यानंतर शिवसेनेने दिल्ली जिंकण्याचा सूर आवळला आहे. मोदी सरकार केंद्रात सक्षम आहे. दिल्लीत आला तर डोक जाग्यावर राहणार नाही

दरम्यान राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेच्या ५६ जागा या केवळ मोदींच्या करिष्म्यामुळेच निवडूण आल्या आहेत. मोदींशी शिवसेने गद्दारी केली. दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर यांची निशाणी फलंदाजाची बॅट होती. धनुष्यबान नव्हता. आघाडी सरकार बनायच्या आधी शरद पवारांसंबंधी आक्षेपार्ह विधाने करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे रिकामे डबके असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले असल्याचे यावेळी नारायण राणे यांनी म्हटले आहे.

तसेच, 'बारामती जाण्याच्या आगोदर राज्यातील शेतकऱ्यांबद्दल एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होते. त्याचबरोबर मागील काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्याबद्दल बोलायला उध्दव ठाकरे यांना वेळ नसल्याचे देखील नारायण राणे यांनी म्हटले आहे. नशीब महाभारतात शरद पवार नव्हते नाहीतर तिथेही फोडाफोडीचे राजकारण शरद पवारांनी केले असते, असेही ठाकरे यांनी उद्गार काढले असल्याचा नामोउल्लेख यावेळी बोलताना नारायण राणे यांनी केला.

शिवाय, ''फक्त बारामतीमध्ये गेल्यानंतर डायलॉगबाजी करुन मुख्यमंत्री पुन्हा मुंबईत आले. मोहनभाई डेलकर तब्बल सात वेळा दादरा नगर हवेलीमधून निवडूण आले होते. तिथे शिवसेनेची काय ताकद काय आहे त्यांनी सांगावे असही राणे यांनी म्हटले. तसेच राष्ट्रवादीने नवाब मलिकांना राज्यात सोडून दिले असल्याचा घणाघात नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना मलिकांवर केला. पंतप्रधान मोदींनी कोरोनाची लस दिली नसती तर राज्यातील स्थिती वाईट झाली असती. सुशांत केस, दिशा सालियान केसमध्ये कोणताही मोठा खुलासा अद्याप झालेले नाही. अशा बरटलेल्या सरकारला भाजपवर टीका करण्याचा काही एक नैतीक अधिकार नसल्याचे देखील यावेळी नारायण राणे यांनी बोलताना म्हटले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT