Narayan Rane  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Narayan Rane Press Conference: 'संजय राऊत शिवसेनेचा पगारी नेता'

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. शिवसेना आणि भाजपमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सौमय्या यांच्यावर घणाघात केला होता. याच पाश्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

राणे म्हणाले, ''शिवसेनेत संजय राऊत कधी आला? हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. काल त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद जणू काही आपण शिवसेनाप्रमुख झाल्यासारखी घेतली. कालच्या पत्रकार परिषदेत राऊत घामाघुम का झाले याचे उत्तर मात्र ते का देत नाहीत. पत्रकाराला शोभेल अशी राऊतांची काल भाषा नव्हती. नुसते आरोप करु नका, त्यासोबत पुरावेही द्या. अडचणीमध्ये सापडल्यामुळे काल राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. कालच्या परिषदेमध्ये केवळ नि केवळ राऊतांनी आरोप केले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तथ्ये नव्हती. साहेबांची आणि उध्दव ठाकरेंची कपडे उतरवीन असही राऊत यापूर्वी म्हणाले होते.''

ते पुढे म्हणाले, आता फक्त पैशासाठी राऊत राजकारणात आले आहेत. प्रवीण राऊत आणि दिवाण यांच्याशी राऊतांचा काय संबंध आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये साडे तीन नेत्यांची नावे राऊतांनी का घेतली नाहीत. राज्यात सत्ता द्या आम्ही शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करु असं राऊतांनी यापूर्वी म्हटले होते. राऊत वारंवार सांगतात मी कुणाला घाबरत नाही, मग नेत्यांची नावे घेण्यासाठी का घाबरतात. लोकांकडून पैसे उभारुन आम्ही शिवसेना भवन उभारले. तु किती पैसे दिले. शिवसेनेला संपविण्यासाठी राऊतांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुपारी घेतली आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा लाचार मुख्यमंत्री कधीच झाला नसल्याचे म्हणत नारायण राणेंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊतांनी वडीलांना वडील म्हणून कधी हाक मारली आहे का? अशी विचारणा देखील नारायण राणे यांनी यावेळी राऊतांकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terror Attack: 'लश्कर' आणि 'जैश'चा भयानक कट! काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मोठ्या हल्ल्याचा डाव; गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

Abhinav Tejrana: तेजराणाची 'तेजस्वी' कामगिरी! रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 651 धावा; IPL संघ 'या' खेळाडूवर डाव लावणार?

अग्रलेख; 'राजा जानी' ते 'चुपके चुपके'चा प्रोफेसर! धर्मेंद्रच्या निधनाने बॉलिवूडने गमावला एक अष्टपैलू नट

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

SCROLL FOR NEXT