'बाप-बेटा लवकरच जेलची हवा खाणार': संजय राऊत

आज पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत सर्वांना अचंबित केलं आहे. थांबा आणि पहा. जेल सॅनिटाइझ करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र.
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. एकेकाळचे सख्ये भाऊ असणारे भाजप आणि शिवसेना आत्ता पक्के वैरी झाले आहेत. शिवसेना आणि भाजपमधील राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यातच आज पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट करत सर्वांना अचंबित केले आहे. थांबा आणि पहा. जेल सॅनिटाइझ करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सध्या दिल्लीत असून आज तेही या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊ शकतात. (Kirit Somaiya And His Son Neil Somaiya Will Have To Go To Jail Soon Said Sanjay Raut)

यापूर्वी संजय राऊत यांनी आरोप करत म्हटले होते की, ''किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानला (Rakesh Wadhwan) ब्लॅकमेल करुन 400 कोटींची जमीन 4 कोटींना विकत घेतली. या जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाचे संचालक किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या आहे. मोहित कंबोजवर 12 हजार कोटींची जमीन 100 कोटींना घेतल्याचा आरोप आहे.''

Sanjay Raut
Sanjay Raut Press Conference: 'हा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है'

दरम्यान, संजय राऊत यांनी हे आरोप करणारे कोणतेही कागदपत्र सादर केले नसले तरी दोन दिवसांत हे कागदपत्र तपास यंत्रणांना दिले जातील, असे सांगितले आहे. दुसरीकडे भाजपच्या वतीने मोहित कंबोज यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांचा पर्दाफाश झाला आहे, मी त्यांना नोटीस पाठवणार आहे, ज्याप्रकारे नवाब मलिकांना (Nawab Malik) न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागले, त्याचप्रमाणे आगामी काळात संजय राऊतांना सामोरे जावे लागेल.''

Sanjay Raut
Sanjay Raut: कोरोना वाढत असताना केजरीवालांना गोव्यात जायची काय गरज?

राऊत म्हणाले की, राज्य सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. खोटे आरोप करुन नेत्यांवर दबाव निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती बंगालमध्येही आहे.

राऊत पुढे म्हणाले की, ''तुम्हीच सांगा, ईडीकडे काम नाही, जे महाराष्ट्रात आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या मागे पडत आहेत. पडायचेच असेल तर पडा, पण तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे. तुम्ही शिवसेनेशी पंगा घेतला तर ते त्यांना खूप जड जाईल. एवढच मी सांगतो.''

राज्यसभा खासदार राऊत म्हणाले, "शिवसेना (Shiv Sena) असो, ठाकरे कुटुंब असो, आनंदराव अडसूळ, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबावर गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून छापेमारी होत आहेत. विशेष म्हणजे हा चिंतेचा विषय आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut Press Conference: 'किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल'

ते पुढे म्हणाले, 'यामागचा संदेश स्पष्ट आहे, तुम्ही शरण या नाहीतर तुम्हाला सत्तेपासून वंचित ठेवू. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून तारीख दिली जात आहे. हे सरकार 10 मार्चला पडेल, ही तारीख तुम्ही कोणत्या आधारावर दिली, असे भाजप नेत्यांनी सांगितले. यासंदर्भात मी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे.'

राऊत पुढे म्हणाले की, ''20 दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोक मला 3 वेळा भेटले आहेत. मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की मी हे सरकारपासूनं वंचित रहावे, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू किंवा काही आमदारांना आमच्या बाजूने घेऊ. मी म्हणालो हे कसे शक्य आहे? जर तुम्ही हे केले नाही, मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू, असे त्यांचे म्हणणे आहे. मग त्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल.' त्या लोकांची नावे मी आता घेत नाही, मात्र लवकरच याही नावांचा खुसाला आम्ही करणार आहोत.'' तसेच ठाकरे सरकारला काही होणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com