Narayan Rane Attacks on Uddhav Thackeray dew to floods and corona Dainik Gomantak
महाराष्ट्र

'हा तर ठाकरे सरकारचा पायगुण'; मुख्यमंत्र्यांवर राणेंचा घणाघात

आज केंद्रीय मंत्री नारायण(Narayan Rane), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर यांनी तळीये गावाची पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

कोरोनासह(COVID-19) राज्यातील नैसर्गिक(Maharashtra Floods) आपत्तीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच(Uddhav Thackeray) जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप भाजपा नेते आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी केला आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान(Heavy Rains) घातला आहे सततच्या या पावसामुळे कोकणासह(Kokan) पश्चिम महाराष्ट्रात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत आणि त्याच दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उ्दधव ठाकरे यांनी चिपळून दौरा केला. यानंतर त्यांनी तेथील नागरिकांना मदतीचे आश्वासनही दिले.

तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री नारायण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि प्रवीण दरेकर यांनी तळीये गावाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. याच पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठकरे तसेच ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात ठाकरे स्थपन झालं आणि हे सरकार येतांचाच येताना कोरोना घेऊन आल. ठाकरे सरकारच कोरोना महामारीला जबाबदार आहे. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून वादळे, महामारी, पूर अशी संकटे कायम येतच आहेत. आणि या सगळयांना केवळ नियोजन शून्य ठाकरे सरकारच जबाबदार आहे म्हणत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे.

तसेच हा पाहणी दौरा करण्याचे मला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले असून आपत्तीग्रस्त भागातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यास सांगितले आहे. आतापर्यंत केवळ 44 मृतदेह सापडले असून अद्याप मृतदेह सापडले हाती लागलेल नाहीत. पुनर्वसन काम प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.त्याचबरोबर केंद्र सरकार पीडितांसोबत असून तळीये गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासनही नारायण राणे यांनी दिले आहे.

यावेळी नारायण राणेंचं हळवं रूपही पाहायला मिळालं, त्या भागाची पहणी करून आणि दृश्य बघून नारायण राणे भावुक होत त्यांनी “केवळ एकच गोष्ट आम्हाला परत आणता येणार नाही, ते म्हणजे मृत्यू झालेल्यांना परत आणता येणार नाही. ही दुर्दैवी बाब आहे पण जे आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलासा देऊ शकू असा मला विश्वास वाटतो.” या शब्दात आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT