Maharashtra News: महाराष्ट्रातील नांदेडमधून (Nanded) एक वेगळी बातमी समोर आली आहे. नांदेड पोलीस खात्यातील महिला पोलिस वर्षा पवार यांनी लिंग बदल शस्त्रक्रियेच्या परवानगीसाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांना पत्र लिहिलं आहे.
वर्षा पवार या मनाठा येथे पोलीस जमादार म्हणून कार्यरत आहेत. शरीरात नैसर्गिक बदल झाल्यामुळे लिंग बदल करून पुरूष व्हायचं आहे. असे वर्षा पवार यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा पवार वडिलांच्या निधनानंतर 2005 मध्ये अनुकंपावर पोलीस दलात भरती झाल्या. गेल्या अनेक वर्षापासून शरीराने स्त्री असून पुरुष असल्याच्या भावना येत असल्याने त्यांनी वैद्यकीय चाचण्या केल्या.
डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेसाठी परवानगी दिली आहे. पण, त्यांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, वर्षा यांनी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यासाठी त्यांनी बीड येथील (Beed Police) पोलीस कॉन्स्टेबल ललित साळवे यांचं उदाहरण देत, शस्त्रक्रियेसाठी परवानगीची मागणी केली आहे.
शरीराने स्त्री असून पुरुष असल्याच्या भावना गेल्या अनेक वर्षापासून वर्षा यांना येत आहेत. विविध चाचण्या केल्यानंतर वर्षा या लिंग परिवर्तन करून पुरुष होण्यास समर्थ असल्याचा अहवाल सेंट जॉर्ज हॉस्पिटलने दिला आहे.
मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे गेल्या दोन वर्षापासून त्या लिंग बदल शस्त्रकियेसाठी धडपड करत आहेत. राज्य सरकारकडे लैंगिक समस्या आणि लिंग ओळखीबाबत कुठलेही धोरण नसल्याने लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.