Deepak Kesarkar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway: "प्रत्येक गोष्टीला विरोध, सामान्य लोकांनी उपाशीच मरायचं का?" शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार्‍यांना केसरकरांनी सुनावलं

Deepak Kesarkar On Nagpur Goa Shaktipeeth Expressway: सावंतवाडी मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा ठाम विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग : सावंतवाडी मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा ठाम विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दीपक केसरकर बोलत होते.

दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणार्‍यांना सुनावलं. ते म्हणाले फक्त विरोधासाठी विरोध करणे योग्य नाही. विकासाच्या दृष्टीने या शक्तीपीठ महामार्गाची अत्यंत गरज आहे, असे ते म्हणाले.

सध्या काही पर्यावरणप्रेमींकडून या महामार्गाला विरोध होत आहे. मात्र, जर प्रत्येक गोष्टीला विरोधच करायचा असेल, तर येथील सामान्य लोकांनी उपाशी मरायचे का? या भागात उद्योगधंदे, कंपन्या याव्यात असे आम्हाला वाटते. त्यासाठी योग्य पायाभूत सुविधा हवीत आणि महामार्ग ही त्यातील महत्त्वाची गरज असल्याचं ते म्हणाले.

पर्यावरणाचा समतोल राखणार

शक्तीपीठ महामार्गामुळे केवळ वाहतुकीची सोय होणार नाही, तर औद्योगिक विकास, रोजगार संधी आणि स्थानिक पातळीवर आर्थिक स्थैर्य येईल. मात्र या सगळ्या विकास प्रक्रियेत निसर्गाचा समतोल राखला जाईल.

सिंधुदुर्ग जिल्हा हा ६० टक्के हरित क्षेत्र असलेला प्रदेश आहे. येथील जनतेने आजवर झाडे, निसर्ग जपलेला आहे. एक झाड तोडले गेले तरी त्याच्या जागी आंबा, काजू, नारळ अशी फळझाडे लावली जातात. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण आपण करतच आहोत, असं दिपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.

महामार्गामुळे विकास होणार

महामार्गाला विरोध करणाऱ्यांना नेमके काय हवे आहे? स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, या भागात उद्योग यावेत हे सर्वांचे स्वप्न आहे. मग अशा मूलभूत गोष्टींना विरोध का? महामार्गामुळे या भागाचा विकास होणार आहे, असं दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT