Sorcery Dainik Gomantak
महाराष्ट्र

वर्ध्यात जादूटोण्याच्या अघोरी प्रकारातून गळा आवळला; एक ठार

मुलाला उपचारासाठी नेले असता संगनमताने आवळला गळा

दैनिक गोमन्तक

जादूटोणा आणि अंधश्रद्धेपोटी राज्यात अनेक व्यक्तींचा बळी गेल्याच्या घटना यापूर्वीच कित्येकदा समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आणखी एक अघोरी प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार वर्धा जिल्ह्यात घडला असून, मुलाला तांत्रिक विद्येने बरे करता यावे यासाठी नेले असता तीघांनी गळा आवळून खून झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १८ मे रोजी गणेश सोनकुसरे (रा. बेलपुरा, अमरावती) यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला उपचारासाठी वरील तीन आरोपीकडे नेले होते. त्यांनी तांत्रिक उपचार केले. शेवटी संगनमत करीत गळा आवळून ठार केले. याबाबत पोलिसांना माहिती न देता मृतदेह फिर्यादीच्या हवाली केला. त्याची तक्रार कोतवाली अमरावती पोलीस ठाण्यात १९ मे रोजी रात्री दाखल झाली. त्यानुसार आर्वी पोलिसांनी कारवाई केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनाईद, अब्दुल जमीर अब्दुल रहीम अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अखील भारतीय अंनिसचे राज्य संघटक पंकज वंजारे म्हणाले, “या घटनेतील बाबा, मांत्रिकांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. चौकशीत आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. यात अंनिसचे संपूर्ण सहकार्य असेल. भविष्यातील अंधश्रध्दांचे बळी थांबतील.”

आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके म्हणाले, “तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले आहे. पीएम रिपोर्टमध्ये गळा आवळल्याच्या खुणा दिसून येत आहेत. हे गंभीर प्रकरण असून कसोशीने चौकशी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT