MPSC परीक्षेत बनावट उमेदवार; आणखी पाच जणांना अटक

नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथे तिघांना घेतले ताब्यात
mpsc
mpsc Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. फक्त अभ्यासाच्या आधारावर अधिकारी होता येते. अशी स्पप्ने घेऊन वर्षानूवर्षे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची फसवणूक अद्याप थांबण्यास तयार नाही. कारण एमपीएसी परीक्षेत बोगस परीक्षार्थींकडून परीक्षा दिल्याच्या घोटाळा प्रकरणात नांदेड सीआयडीने आणखी पाच जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बनावट उमेदवार परीक्षार्थी म्हणून बसवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात सीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात नांदेड गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करत दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. गुरुवारी आणि आज केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सीआयडीने परभणी आणि पुणे या ठिकाणांहून दोघांना आणि नांदेडमधून तीन जण, अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

mpsc
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार शाळकरी मुलांसह आठ जण धरणात बुडाले, एक मुलगी बेपत्ता

नांदेड सीआयडीने अटक करण्यात आलेला एक आरोपी उमेदवार हा परभणी जिल्हा परिषदेचा महिला आणि बालकल्याण विभागातील पर्यवेक्षीय अधिकारी आहे. या आरोपीचे नाव रवी भिमनवार आहे. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून पदावर असणाऱ्याला अटक केली. या आरोपीचे नाव संदीप पवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

mpsc
डिझेल टँकर अन् ट्रकचा भीषण अपघात! 9 जणांचा जागीच मृत्यू

गुरुवारी नांदेड CID ने परभणी आणि पुणे येथे कारवाई केल्यानंतर मुख्य आरोपी प्रबोध राठोडच्या घराची झाडाझडती घेतली. नांदेडमधील मांडवी येथील घरातून विविध कागदपत्रे तपासण्यात आली. त्याशिवाय कुटुंब, नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली असल्याचे समजते.या बोगस परीक्षार्थी प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामूळे ऐन उमेदीच्या वयात अभ्यास करणाऱ्या उमेवारांचा वनवास संपणार आहे का? असा प्रश्न आता उमेवारांकडून विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com