Mumbai's Byculla zoo  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai's Byculla Zoo: मुंबईतील प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी उन्हापासून बचावासाठी खास व्यवस्था, पाहा व्हिडिओ

उन्हाचा त्रास प्राण्यांनाही होत असल्याने भायखळा प्राणीसंग्राहालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Puja Bonkile

Mumbai's Byculla Zoo: मुंबईसह राज्यात उष्णतेच्या झळा सुरु झाल्या आहेत. तापमान 40 शीच्या वर पोहचले आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची काहिली होत आहे. या

उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक छत्र्या तर शीतपेयाचा आधार घेत आहे. या उन्हाचा प्राण्यांनाही फटका बसत आहे. यामुळे प्राण्यांची काळजी घेण्यासाठी मुंबईच्या भायखळा प्राणी संग्रहालयामध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये वाघ मस्त पाण्यात फिरतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे तळ करण्यात आले आहेत.

ब्रिटीशकाळात इंग्लंडची राणी क्वीन व्हिक्टोरिया यांच्यासाठी भायखळा येथे उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारण्यात आले होते. ही बाग 53 एकर परिसरात पसरलेली आहे. मुंबईमधील (Mumbai) सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. या बागेचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते.

नंतर या बागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय असे करण्यात आले. या बागेत 286 प्रजातीची 3231 पक्ष आणि 853 वनस्पती आहेत. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांच वास्तव्य या उद्यानात आहे. राणीबाग हे पर्यटकांचे तसेच विशेष करून व कंपनीये आवडीचे ठिकाण आहे.

या ठिकाणी रोज हजारो नागरीक भेट देत असतात. दरम्यान, उन्हामुळे येथील प्राण्यांची देखील काहिली होत आहे. त्यामुळे उद्यान व्यवस्थापनाने प्राण्यांसाठी खास व्यवस्था केली आहे.

वन्यप्राण्यांना हायड्रेत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांच्या आहार योजनेत देखील बदल करण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देतांना उद्यानाच्या पशूवैद्यकीय अधिकारी डॉ कोमल राऊळ म्हणाल्या, प्राण्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी त्यांच्या आहार योजनेत बदल करण्यात आले आहेत. आम्ही टरबूज, कस्तुरी यांसारखी हंगामी फळे जनावरांना देतो.

आम्ही त्यांना बर्फाचे केक देखील देतो. या सोबतच पाण्याच्या फवारे देखील लावण्यात आले आहे. तसेच शेड देखील उभारण्यात आले आहेत. या द्वारे प्राण्यांचा उन्हापासून बचाव करण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT