Mumbai to Konkan M2M Ferries Schedule Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai- konkan M2M Ferries: चाकरमान्यांना बोटीनं जाता येणार गावी! ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका; पाहा 'एम टू एम' फेरीचे वेळापत्रक

Mumbai to Konkan M2M Ferries Schedule: गावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी या कटकटीतून आता कोकणी माणसाची सुटका होणार आहे.

Sameer Amunekar

चाकरमान्यासाठी यंदाचा शिमगोत्सव विशेष ठरणार आहे. होळीच्या सणाला गावी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी या कटकटीतून आता कोकणी माणसाची सुटका होणार आहे. राज्य सरकारने मुंबई ते विजयदुर्ग अशी थेट जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे यंदाचा 'शिमगा' अधिक सुखकर होणार आहे.

सात तासांत मुंबई ते विजयदुर्ग प्रवास

१ मार्च २०२६ पासून मुंबईतील 'भाऊचा धक्का' (माझगाव) ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक 'विजयदुर्ग' दरम्यान 'एम टू एम' फेरी सेवा अधिकृतपणे सुरू होत आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत यामुळे मोठी बचत होणार आहे.

रस्ते मार्गे विजयदुर्गला पोहोचण्यासाठी १० ते १२ तास लागतात, मात्र या फेरी सेवेमुळे हे अंतर अवघ्या ७ तासांत पार करता येणार आहे. या उपक्रमाची माहिती देताना आमदार नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केला असून, १ मार्च रोजी होणाऱ्या या बोटीच्या पहिल्या प्रवासात ते स्वतः चाकरमान्यांसोबत प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गर्दी आणि वाहतूक कोंडीला पर्याय

शिमगोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. एसटी आणि खासगी बसचे दरही या काळात गगनाला भिडलेले असतात. अशा परिस्थितीत, जलमार्गाचा हा पर्याय मध्यमवर्गीय चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

समुद्राच्या लाटांवर स्वार होत, निसर्गाचा आनंद घेत यंदा कोकणी माणूस आपल्या लाडक्या 'ग्रामदेवतेच्या' दर्शनासाठी सज्ज झाला आहे. या फेरी सेवेमुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेरी सेवेचे सविस्तर वेळापत्रक

प्रवाशांच्या सुविधेसाठी १ मार्च ते ८ मार्च दरम्यानचे विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे:

  • १ मार्च: मुंबई (सकाळी ८:००) ते विजयदुर्ग (दुपारी ३:००)

  • २ मार्च: विजयदुर्ग (दुपारी १२:००) ते मुंबई (संध्याकाळी ७:००)

  • ४ मार्च: मुंबई (सकाळी ८:००) ते विजयदुर्ग (दुपारी ३:००)

  • ५ मार्च: विजयदुर्ग (दुपारी १२:००) ते मुंबई (संध्याकाळी ७:००)

  • ७ मार्च: मुंबई (सकाळी ८:००) ते विजयदुर्ग (दुपारी ३:००)

  • ८ मार्च: विजयदुर्ग (दुपारी १२:००) ते मुंबई (संध्याकाळी ७:००)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Crime: दिल्लीत माणुसकीला काळिमा; 70 वर्षांच्या अंध आणि मतिमंद वृद्धेवर विटेनं हल्ला करत बलात्काराचा प्रयत्न; 'नराधमाला तात्काळ फाशी द्या'

Viral Video: "ऑफिसचं टार्गेट की मृत्यूला आमंत्रण?", चालत्या गाडीवर पठ्ठ्याचा भयंकर स्टंट; वाहतुकीच्या नियमांचे धिंडवडे काढणारा व्हिडिओ व्हायरल

Crime News: 24 वर्षीय तरुणीचं अपहरण करुन दोनदा बलात्कार अन् अमानुष छळ, भारतीय वंशाच्या नराधमाला 34 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

IND vs PAK Live Streaming: भारत-पाकिस्तान थरार! टी20 विश्वचषकात रंगणार हाय-व्होल्टेज लढत; सामन्याच्या वेळेसह जाणून घ्या सर्व माहिती

Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणाचा तोल गेला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

SCROLL FOR NEXT