Ro-Ro Service Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ro-Ro Service: मुंबईहून 4 तासांत मालवण, तर 3 तासांत रत्नागिरी! लवकरच सुरु रो-रो सेवा, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट

Mumbai To Ratnagiri Ro-Ro Boat Service: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

Mumbai To Ratnagiri Ro-Ro Boat Service: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो बोट सेवा लवकरच सुरु होणार आहे. यामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी आणि वेळखाऊ प्रवास टाळून अवघ्या काही तासांत कोकण गाठणे शक्य होणार आहे.

जलद प्रवास: ही अत्याधुनिक रो-रो बोट 24 नॉटिकल माईल्स प्रति तास वेगाने धावणार आहे. यामुळे मुंबईहून (Mumbai) रत्नागिरीला अंदाजे तीन ते साडेतीन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे, तर मालवण आणि विजयदुर्गला साडेचार तासांत पोहोचता येईल.

क्षमता: 55 कोटी रुपयांची ही नवी रो-रो बोट एकाच वेळी 500 प्रवासी आणि 150 वाहने (खाजगी गाड्या, दुचाकी, बस) घेऊन प्रवास करु शकते.

प्रवाशांसोबत वाहनेही: या सेवेमुळे प्रवासी आपल्या खासगी गाड्या घेऊन थेट कोकणात जाऊ शकतील. यामुळे रस्त्यावरचा प्रवास, इंधन खर्च आणि थकवा टाळता येईल.

पावसाळ्यातही सेवा: ही बोट विशेष तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने पावसाळ्यातही जलवाहतूक करणे शक्य होणार आहे.

कोकणवासीयांना मोठा दिलासा

गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा (Goa) महामार्गावरील रखडलेली कामे, खड्डे आणि गणेशोत्सवातील प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती. रेल्वे तिकिटांचा तुटवडा ही देखील एक मोठी समस्या होती. या पार्श्वभूमीवर, रो-रो सेवेमुळे कोकण प्रवास आता अधिक आरामदायी, वेगवान आणि सोयीचा होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला असून परवडणाऱ्या दरात हा नवा जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, 1964 नंतर मुंबई ते कोकण जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर बंद झाली होती. आता अनेक वर्षांनंतर ही सेवा पुन्हा सुरु होत असल्याने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरी प्रकरणातील प्राध्यापकाचा 'दुसऱ्यांदा' जीवन संपवण्याचा प्रयत्न

Goa Crime: भिंतीवरून मारल्या उड्या, पंचांवर हेल्मेटने हल्ला; दुर्गा-चिंचोणे येथे दिवसाढवळ्या भरवस्तीत घरफोडीचा प्रयत्न

Rashi Bhavishya 18 July 2025: एखादं स्वप्न साकार होऊ शकतं, नव्या करारापूर्वी नीट विचार करा; निर्णय घ्यायला उत्तम दिवस

Goa Politics: अमित पाटकरांच्या तक्रारीवर आमदार कार्लुस फेरेरा हसले; म्हणाले, 'ते बालिश आणि इमॅच्युर कृत्य'

पेपरफुटी प्रकरणातील प्राध्यापकाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, गोव्यात सोलर - इलेक्ट्रिक क्रूझ बोटीचे उद्धाटन; वाचा ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT