मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत (Mumbai to Sindhudurg) थेट हवाई सेवा (Air service) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 9 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होईल. Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई - सिंधुदुर्ग हवाई यात्रेला 9 ऑक्टोबरपासून 'टेक ऑफ'

मुंबईतून सिंधुदुर्गला महामार्गाने जाण्यास साडेनऊ तास इतका वेळ लागतो. पण आता हवाई मार्गाने (Air service) हा वेळ फक्त 1 तास 25 मिनिटांवर आला आहे. कोकणात (Konkan) मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

दैनिक गोमन्तक

कुडाळ: मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत (Mumbai to Sindhudurg) थेट हवाई सेवा (Air service) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 9 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होईल. केंद्राच्या आरसीएस उडान योजने (RCS flight plan) अंतर्गत ही सेवा कार्यरत असेल. याच्या ऑनलाइन बुकिंगला देखील आजपासून सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग विमानतळावर (Sindhudurg Airport) 1 ऑक्टोबरपासून या सेवेचे तिकीट बुकिंग उपलब्ध होईल, अशी माहिती सिंधुदुर्गचे स्टेशनचे व्यवस्थापक (Station Manager of Sindhudurg) अलायन्स एअर समीर कुलकर्णी (Air Sameer Kulkarni) यांनी आज दिली.

वेंगुर्लेतील चिपी विमानतळाबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, ‘‘या विमानतळाचे नाव सिंधुदुर्ग विमानतळ असून, याचा कोड एसडीडब्ल्यू आहे. अलायन्स एअर सिंधुदुर्गला त्याच्या एम्बिटमध्ये जोडत असून, मुंबईमार्गे सिंधुदुर्गशी जोडणारी ही प्रथम विमानसेवा आहे. ही सेवा दररोज असून मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी असेल. 74 आणि 75 व्या आरसीएस मार्गांसाठी विमान सेवा देणाऱ्या 109 मार्गांपैकी हा एक हवाई मार्ग असेल. या हवाई मार्गाला कोकण किनारपट्टीच्या राष्ट्रीय हवाई नकाशावर आणेल गेले आहे. मुंबईतून सिंधुदुर्गला महामार्गाने जाण्यास साडेनऊ तास इतका वेळ लागतो. पण आता हवाई मार्गाने हा वेळ फक्त 1 तास 25 मिनिटांवर आला आहे. कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

या विमान सेवेचे तिकिट मुंबई-सिंधुदुर्गपर्यंत 2,520 रुपये, तर सिंधुदुर्ग ते मुंबईतच्या प्रवासासाठी 2,621 रुपये असेल. 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरु करणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे. उड्डाण सुरु झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत सेवा असून, जी कोकण विभागातील ग्रीनफिल्ड विमानतळावरून सुरु होणार आहे. ही सेवा केंद्र सरकारद्वारे संचालित प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत सुरू केली जात आहे. मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक-ऑफ करुन दुपारी 1 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचेल. तर सिंधुदुर्गातून या विमानाचा परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरु होऊन, ते मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Valpoi: वाळपईत 4 वर्षांत दगावली 154 गुरे! वाढती प्लास्टिक समस्या चिंताजनक; 12 महिन्यांची वासरेही बाधीत

'कुंपणंच खातंय शेत', केस मिटवण्यासाठी पोलिसाने घेतली लाच; वाळपईत हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

Rajmata Jijabai Karandak: गोव्याने गुजरातला हरवले! करिष्माचा मौल्यवान गोल; मुख्य फेरीतील जागा पक्की

SCROLL FOR NEXT