Vaccination Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत कोरोनाचा कहर, 4 महिन्यांत आढळले सर्वाधिक रुग्ण

मुंबईत (Mumbai) कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी 4 महिन्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत 739 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील संसर्गाचा दर 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 फेब्रुवारीनंतरची ही सर्वाधिक वाढ आहेत.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे म्हटले की, मुंबईतील कोरोना रुग्णांना तात्काळ ट्रेस केले जाईल. कारण शहरात चाचणीदरम्यान पॉझिटिव्ही रेट सहा टक्क्यांवर पोहोचला आहे. बीएमसीने (BMC) पुढे म्हटले की, आम्ही अधिकाऱ्यांना 'युद्धपातळीवर' टेस्ट वाढवण्यास सांगितले आहे.

"मुंबईत (Mumbai) दैनंदिन रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असताना, कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होईल," असा इशारा देण्यात आला आहे. बीएमसीने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण (Vaccination) मोहीम आणि बूस्टर डोस वाढवण्यास सांगितले आहे. मंगळवारी, मुंबईत 506 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, जी या वर्षी 6 फेब्रुवारी नंतरची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या वर्षी एप्रिलमध्ये नोंदवलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत मुंबईत मे महिन्यात नोंदवलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fixing: टी-20 विश्वचषकापूर्वी मोठा धक्का! 'या' स्टार फलंदाजावर फिक्सिंगचा आरोप, 'ICC'कडून तत्काळ निलंबन

Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

Ajit Pawar: "हो ला हो अन् नाही ला नाही" सांगणारा सिंह हरपला! गडकरींनी सांगितला अजितदादांच्या रोखठोक निर्णयांचा किस्सा

Ajit Pawar Funeral: महाराष्ट्र पोरका झाला! 'अजित दादा' अनंतात विलीन; मुख्यमंत्री सावंतांनी साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली

Shocking News: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्लीच्या खेळाडूंकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड

SCROLL FOR NEXT