Gunaratne Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी गुणरत्ने सदावर्ते यांना घेतले ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा अखेर तिढा सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यालयाने दिले आहेत. आज राष्ट्रवादी कॉंग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कर्मचारी यांनी आंदोलन केले. यातच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी गुणरत्ने सदावर्ते यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'माझी हत्या होऊ शकते. माझ्या पत्नीने दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर मला कोणत्याही स्वरुपाची नोटीस न देता पोलिस मला घेऊन जात आहेत.' (Mumbai Police have arrested Gunaratne Sadavarte for questioning)

दरम्यान, गुणरत्ने सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवून शरद पवारांच्या निवासस्थानी पाठवले असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत, असे सांगण्यात येत आहे. माझ्या जीवाला काही झालं तर त्यास वळसे-पाटील जबाबदार असतील, असेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

तसेच, एसटी कर्मचारी कामावर हजर झाले तर एसटी महामंडळाने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांनाही नोकरीवरुन काढले जाणार नाही, अशी तरतूद करण्याचे आदेश बुधवारी न्यायालयाने दिले होते. आमच्या 125 भावंडांचा खून केला असल्याचे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांविरोधात घोषणा देत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. त्याचबरोबर गुणरत्ने सदावर्ते आम्हाला जे काही सांगतील तेच आम्ही करणार असल्याचे देखील एसटी कर्मचारी म्हणत आहेत.

प्रविण दरेकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश या मग्रुर सरकारने ऐकला नाही. कर्मचाऱ्यांच्या व्यथेकडे ठाकरे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज शरद पवारांच्या निवासस्थानावर आक्रोश व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. ठाकरे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर आम्ही पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. जो काही तोडगा काढायचा असेल तो चर्चेतून काढण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT