Metro  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Metro Rail Recruitment: मुंबई मेट्रोमध्ये अर्ज करा आणि दरमहा दोन लाखांपर्यंत पगार मिळवा

मुंबई मेट्रोमध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे उशीर करू नका आणि लवकरात लवकर अर्ज करा.

दैनिक गोमन्तक

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भर्ती 2022: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सहाय्यक महाव्यवस्थापक ते कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता अशी पदे या भरती मोहिमेद्वारे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. MMRCL या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 27 पदांची भरती करणार आहे. महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2022 आहे.

रिक्त पदांचा तपशील –

असिस्टंट जनरल मॅनेजर – 5 जागा

असिस्टंट मॅनेजर – 2 जागा

उप अभियंता – 2 जागा

कनिष्ठ पर्यवेक्षक – 1 जागा

कनिष्ठ अभियंता – 16 जागा

असिस्टंट (आयटी) – 1 जागा

असा करा अर्ज-

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला महा मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com ला भेट द्यावी लागेल. अर्ज केल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रत त्यासोबत जोडावी लागेल. आणि हे संपुर्ण कागदपत्र डेप्युटी जनरल मॅनेजर (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) मुंबई - 400051. या पत्त्यावर पोस्ट करावे लागेल.

कोण करू शकतो अर्ज

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) च्या या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलते. तपशीलवार जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासणे गरजेचे आहे. प्रत्येक पोस्टसाठी वयोमर्यादा देखील वेगवेगळी आहे जी सूचनांमध्ये पाहिली जाऊ शकते.

वेतनश्रेणी

MMRCL च्या या पदांवर निवड झाल्यानंतर, उमेदवारांना पदानुसार वेतन देखील मिळेल. ते महिन्याला 60 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत असू शकते. या पदासंबधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT