Mumbai-Goa Vande Bharat: मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची सुरवात 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या मार्गावर धावणाऱ्या इतर रेल्वेगाड्यांच्या तुलनेत या रेल्वेला कमी वेळ लागतो. तथापि, आता या प्रवाशात आणखी वेळ वाचणार आहे.
ही गाडी आणखी गतीमान होणार असल्याने प्रवाशांचे या मार्गावरील या ट्रेनने केलेल्या प्रवासात आणखी दोन तास वाचणार आहेत.
मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनची गती 1 नोव्हेंबर 2023 पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाचा कालावधी दहा तासांवरून अवघ्या 7 तास 45 मिनिटांवर येणार आहे.
पावसाळ्यात कोकणात सर्वाधिक पाऊस कोसळतो. त्यामुळे खबरदारी म्हणून कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी मान्सून वेळापत्रक लागू केले जातात. यात गाडीच्या वेगावर मर्यादा येतात.
10 जून ते 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत हे वेळापत्रक लागू आहे. पण 1 नोव्हेंबर 2023 पासून कोकण रेल्वे नॉन मान्सून वेळापत्रक लागू होईल. एक नोव्हेंबरनंतर वंदे भारतसह या मार्गावरील इतरही 50 मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेग वाढणार आहे.
ही गाडी मुंबईहून सकाळी 5.32 वाजता सुटते तर त्याचदिवशी संध्याकाळी 3.30 वाजता मडगावला पोहोचते. तर मडगावहून दुपारी 12.20 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10.20 वाजता पोहोचते. तथापि, यातील आता दोन तासांचा वेळ वाचणार आहे.
दरम्यान, या ट्रेनचे एसी खूर्चीचे भाडे 1,970 रूपये आहे. तर, एक्सिक्युटिव्ह खूर्चीसाठी 3,535 रूपये मोजावे लागणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.