कोरोनानंतर दोन वर्षांनी देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहेत. अनंत चतुर्दशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. गणेश भक्तांना बाप्पाला भावपूर्ण निरोप देता यावा यासाठी मध्य रेल्वेनंही काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत.
गणरायाचा विसर्जन सोहळा काही दिवसांवर आला आहे. 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेऊन जाणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून भाविक गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि लालबागमध्ये उपस्थित राहतात. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी खास प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दिनांक 10.9.2022 (9/10/2022 रोजी मध्यरात्री) सीएसएमटी-कल्याण आणि सीएसएमटी -पनवेल स्थानकांदरम्यान 10 उपनगरीय गाड्या सुरू केल्या आहेत. गणेश विसर्जनासाठी या विशेष ट्रेन (Mumbai Special Trains) चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपनगरीय लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
मेन लाईन-अप विशेष ट्रेन
CSMT विशेष लोकल : कल्याणपासून 00.05 वाजता सुटेल आणि 01.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल
CSMT विशेष लोकल : ठाण्याहून 01.00 वाजता सुटेल आणि 02.00 वाजता सीएसएमटीला पोहोचेल
CSMT विशेष लोकल: ठाण्याहून 02.00 वाजता सुटेल आणि 03.00 वाजता सीएसएमटीला पोहोचेल
मेन लाईन-डाऊन विशेष ट्रेन
कल्याण विशेष लोकल : सीएसएमटीपासून 1.40 वाजता सुटेल आणि 03.10 वाजता कल्याणला पोहोचणार
ठाणे विशेष लोकल : सीएसएमटीपासून 02.30 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता ठाण्याला पोहोचणार
कल्याण विशेष लोकल : सीएसएमटीपासून 3.25 वाजता सुटेल आणि 4.55 वाजता कल्याणला पोहोचणार
हार्बर लाईन-अप विशेष ट्रेन
सीएसएमटी विशेष लोकल: पनवेलपासून सकाळी 01.00 वाजता सुटेल आणि 02.20 वाजता सीएसएमटीला पोहोचणार
सीएसएमटी विशेष लोकल: पनवेलपासून सकाळी 01.45 वाजता सुटेल आणि 03.05 वाजता सीएसएमटीला पोहोचणार
हार्बर लाईन-डाऊन विशेष ट्रेन
पनवेल विशेष लोकल: सीएसएमटीपासून 01.30 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता पनवेलला पोहोचणार
पनवेल विशेष लोकल: सीएसएमटीपासून 02.45 वाजता सुटेल आणि 04.05 वाजता पनवेलला पोहोचणार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.