BJP leader Kirit Somaiya Dainik Gomantak
महाराष्ट्र

INS Vikrant Case: किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

INS Vikrant Case: भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने म्हटलयं की, '18 ते 22 एप्रिल दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेसमोर जा आणि तपासात सहकार्य करा.' पोलिसांनी अटक केल्यास तात्काळ 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश न्यायालाने दिले आहेत. विमानवाहू जहाज INS विक्रांतला तोडण्यापासून वाचवण्यासाठी जमा केलेल्या 57 कोटी रुपयांहून अधिक रकमेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. सोमय्या यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दावा केला होता की, ''सत्र न्यायालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात त्रुटी आहे.''

तसेच, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सोमय्या यांनी म्हटले होते की, 'तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असून ती तब्बल नऊ वर्षांनी दाखल करण्यात आली आहे.' शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांकडूनही आयएनएस विक्रांतला (INS Vikrant) वाचवण्यासाठी निधी गोळा करण्यात आला होता, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. पैसे गोळा करण्याची मोहीम त्यांनी वैयक्तिकरित्या चालवली नसून ती पक्षाच्या पातळीवर चालवली होती, असं देखील सोमय्यांनी म्हटलंय. तत्पूर्वी, विशेष न्यायाधीश आर. के. रोकडे यांनी सोमय्या यांची याचिका फेटाळून लावली होती.

याशिवाय, जमा झालेली रक्कम आपण महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे जमा करणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले होते, मात्र ही रक्कम राज्यपालांकडे जमा करण्यात आली नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. ट्रॉम्बे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि इतरांनी हा निधी गोळा केला होता. INS विक्रांतने 1961 ते 1997 पर्यंत देशाची सेवा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT