Mumbai-Goa Highway Traffic Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; शिमग्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची उडाली दैना!

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. शिमग्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway Traffic Jam Due To Holi Weekend Travel

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. शिमग्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे.

चाकरमान्यांची पुरती दैना उडाली

दरम्यान, मुंबईतून (Mumbai) शिमगोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे फज्जा उडाला आहे. रायगडमधील माणगावमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. माणगाव, इंदापूर, नागोठणे, वडकळ परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. काही प्रवासी काल (12 मार्च) मध्यरात्रीपासून या वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत. त्यामुळे तीन-चार तासांच्या प्रवासाला मुंबईकरांना आठ तास लागत आहेत.

कोकणातील 'शिमगोत्सव'

कोकणात (Konkan) सध्या शिमग्याची धूम पाहायला मिळत आहे. शिमगोत्सव हा एक उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध सण आहे जो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोव्याच्या काही भागात साजरा केला जातो. शिमगोत्सवातील अनोख्या परंपरा या सणाची रंगत वाढवतात. गणपतीनंतर कोकणातील हा सर्वात मोठा सण आहे. हा उत्सव सुमारे पंधरा दिवस विविध पारंपारिक विधींसह साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT