Mumbai- Goa Highway Accident
Mumbai- Goa Highway Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai- Goa Highway: मुंबई- गोवा हायवे अपघातात 25 वर्षीय तरुण जागीच ठार

दैनिक गोमन्तक

Mumbai- Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील अपघाताची घटना ताजी असताना महामार्गावरील पाली पाथरट उभी धोंड येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास आणखी एक अपघात घडला.

या अपघातात 25 दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

काही काळानंतर पोलिसांनी ती सुरळीत केली. महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळं रस्त्यावर खड्डे व माती असल्याने वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय.

अपघात झालेल्या मुलाचे नाव प्रदीप प्रभाकर धाडवे असं आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे हा पाथरट,पाली येथील रहिवाशी आहे. प्रदीप धाडवे शनिवारी आपल्या कामानिमित्त रत्नागिरी येथे चालला असताना त्याच्या बाईकला अपघात झाला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रदीप धाडवे याच्या मृतदेहावर पाली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रदीपच्या घरची (Home) परिस्थिती बेताची असून किरकोळ मोलमजुरीचा कामधंदा करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता. प्रदीपचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर (Family) दुखांचे डोंगर कोसळले आहे.

  • मुंबई महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच

मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कशेडी घाटात मुंबईकडून (Mumbai) खेडच्या दिशेने जाणार्‍या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत चालकासह 6 जण जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT