Mumbai Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Mumbai - Goa Highway Traffic Jam: मुंबई - गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था, खड्डे आणि वडखळ नाक्याची झालेली दुरावस्था याविरोधात शेकापनं आंदोलन केले जात आहे.

Pramod Yadav

रायगड: मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील वडखळ येथे शेकापनं आंदोलन सुरु केल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. वडखळ नाक्याच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात शेकापनं आंदोलन सुरु केले आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण - रायगड येथील पेझारी वडखळ नाक्याची दुरावस्था झाली असून, याविरोधाक शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन छेडले आहे. मोठ्या संख्येने आंदोलक येथे जमा झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

मुंबई - गोवा महामार्ग गेल्या पंधरा वर्षापासून रखडला आहे. महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारकडून वारंवार विविध डेडलाईन दिली जात आहे. गेल्या वर्षी गणपती उत्सवापूर्वी पूर्ण होण्याचे आश्वासन देण्यात आलेल्या महामार्गाचे काम अजून सहा महिने सुरु राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महामर्गावरील खड्ड्यांचा प्रश्न अद्याप तसाच असून, खड्डे अपघतांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे कोकणातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

या गणपती उत्सवादरम्यान देखील मुंबई - गोवा महार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. दरम्यान, आता सणाच्या काळात देखील महामार्गावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. जोडून येणाऱ्या सुट्या आणि सणाच्या निमित्ताने कोकणवासीय आणि पर्यटक कोकणात दाखल होतील, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. यावर कायमचा तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT