आमदार जीशान सिद्दीकी Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी!

जगताप यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप झीशान सिद्दीकी यांनी केला आहे. जगताप अनेकदा याच नादात बोलतात असेही झीशान सिद्दीकी यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) युवक विंगचे अध्यक्ष आणि आमदार जीशान सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याबद्दल तक्रार केली आहे.

वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात रविवारी काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी भाई जगताप यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप झीशान सिद्दीकी यांनी केला आहे. भाई जगताप अनेकदा याच नादात बोलतात असेही झीशान सिद्दीकी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी माझ्या समाजाबद्दल आणि माझ्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याचं झीशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे. भाई जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddiqui) यांनी सोनिया गांधींना केली आहे.

गगनाला भिडणारी महागाई, डिझेल-पेट्रोल आणि एलपीजीच्या दिवसेंदिवस चौपट वाढणाऱ्या किंमती आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. रविवारी काढण्यात आलेल्या या मोर्चाअंतर्गत दादर येथील डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar) यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहापासून शिवाजी पार्क येथे भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह केंद्रीय नेते के.सी.वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील हेही सहभागी झाले होते.

राजगृहाबाहेर मोदी सरकारच्या विरोधात जमलेले काँग्रेसजन एकमेकांना भिडले. मिळालेल्या माहितीनुसार, राजगृहात जाण्यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार जीशान सिद्दीकी, युवा नेते सूरज सिंह ठाकूर यांच्यात वाद झाला. झीशान सिद्दीकीला आत प्रवेश दिला नाही. फक्त दहा जणांना आत प्रवेश दिला जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वादाचे आणखी एक कारण समोर आले.

ज्या ट्रकवर ज्येष्ठ नेते उपस्थित होते, त्या ट्रकलाही चढण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या झीशान सिद्दीकी पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेला. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यापासून रोखण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: डिचोलीत साडेतीन महिन्यांत 5 अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी, तीन प्रकरणांत राज्याबाहेरील युवकांचा हात

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्ये सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

SCROLL FOR NEXT