आप नेते विश्वेश परब काँग्रेसमध्ये करणार प्रवेश !

16 नोव्हेंबर रोजी काँग्रेस (Congress) पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. वाळपईतील लक्ष्मीबाई मेमोरियल सभागृहात सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
Vishwesh Parab
Vishwesh ParabDainik Gomantak

पर्ये: वाळपईतील सामाजिक कार्यकर्ते आणि सत्तरीतील आम आदमी पार्टीचे नेते विश्वेश परब (Vishwesh Parab) यांचे येत्या मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. वाळपईतील लक्ष्मीबाई मेमोरियल सभागृहात सायंकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या प्रवेशावेळी काँग्रेस पक्ष राज्य अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, जेष्ठ काँग्रेस नेते आणि पर्ये मतदार संघाचे आमदार प्रतापसिंग राणे, कुडतरीचे आमदार अॅलेक्स रेजिनाल्ड, वाळपई मतदार संघाचे माजी आमदार अशोक परब, वाळपई गट अध्यक्ष हरिश्चंद्र मानकर, उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष रोशन देसाई यांच्या सहित शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित असणार आहे.

Vishwesh Parab
माजी सभापतींचे बंधू प्रेमेंद्र शेट यांनी समर्थकांसह मगोत केला प्रवेेश!

विश्वेश परब हे वाळपई मतदार संघाचे माजी आमदार अशोक परब यांचे सुपुत्र असून सत्तरीतील जमीन मालकी हक्क आणि इतर प्रश्नावर वारंवार त्यांनी आवाज उठवला आहे. सत्तरीतील आय. आय. टी. विरोधी आंदोलन किंवा कोविड टाळेबंदीच्या काळात गरीब जनतेला शिधा पोहण्याचे काम त्यांनी मोठ्या तळमळीने केले आहे. सत्तरीतील सामान्य जनतेसाठी धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची या भागात ओळख आहे.

प्रतापसिंग राणेची घेतली भेट

दरम्यान विश्वेश परब यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांची नुकतीच साखळी कुळण येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष हरिश्चंद्र मानकर उपस्थित होते. दिवाळी सणाच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली असून काँग्रेस पक्षात दाखल होण्यासंबंधी चर्चाही यावेळी केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रतापसिंग राणे 16 रोजी विश्वेश परबच्या काँग्रेस प्रवेशाबाबत स्वागत केले असून प्रवेशावेळी उपस्थित राहणार असल्याचे श्री परब यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com