mumbai bkc apple store fight Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video: iPhone 17 खरेदीवरून तुफान हाणामारी! 'आधी मला, आधी मला' म्हणत ग्राहकांनी घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल

iPhone 17 customers clash: शुक्रवारपासून १९ सप्टेंबर ॲपलने त्यांच्या नवीनतम स्मार्टफोन मालिकेची विक्री भारतात सुरू केली असून, देशभरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Sameer Amunekar

शुक्रवारपासून १९ सप्टेंबर ॲपलने त्यांच्या नवीनतम स्मार्टफोन मालिकेची विक्री भारतात सुरू केली असून, देशभरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअर या नव्या मॉडेल्ससाठी ग्राहकांनी मध्यरात्रीपासूनच ॲपल स्टोअर्सबाहेर रांगा लावल्या.

दिल्ली आणि मुंबईतील प्रमुख स्टोअर्स सकाळपासूनच गजबजले होते. काही ग्राहकांनी तर रात्रीपासून ब्लँकेट व खाद्यपदार्थांसह रांगेत थांबून आपली पाळी सुरक्षित केली होती.

दरम्यान, मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील ॲपल स्टोअरमधून एक गोंधळाची घटना समोर आली आहे. प्रचंड गर्दीत पुढे जाण्यासाठी काही जणांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, घटनास्थळी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि विक्री सुरळीत सुरू राहिली.

दिल्लीतील सिलेक्ट सिटी वॉक मॉल आणि वसंत कुंज येथील ॲपल स्टोअर्समध्येही रात्रीपासूनच ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. अनेकांना केवळ “पहिला ग्राहक” होण्याचा अनुभव घ्यायचा होता. ॲपल स्टोअरमधून थेट डिव्हाइस घेणे, लाईव्ह अनबॉक्सिंग पाहणे आणि ॲपल टीमशी संवाद साधणे, या गोष्टींना ग्राहकांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.

ऑनलाईन आणि रिटेल चॅनेल्सवर ही मॉडेल्स उपलब्ध असली तरीही, प्रत्यक्ष ॲपल स्टोअरमधून फोन खरेदी करण्याचा उत्साह तंत्रज्ञान प्रेमींमध्ये कायम आहे.

आयफोन १७ मालिकेची वैशिष्ट्ये म्हणजे नवीन रंगसंगती, अधिक प्रगत कॅमेरे, जलद प्रोसेसर आणि बॅटरी कार्यक्षमतेत सुधारणा यामुळे विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण दिसून आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, भारतातील वाढत्या विक्रीमुळे ॲपलची बाजारपेठ अधिक मजबूत होत असून, या विक्रीच्या उत्साहाने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारतीय ग्राहक अॅपलच्या उत्पादनांना सर्वोच्च प्राधान्य देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT