Mumbai Gold Smuggling Bust Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

26 Smugglers Arrested at Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचे केंद्र बनल्याचे समोर आले.

Manish Jadhav

DRI Mumbai Gold Smuggling Bust 2026: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचे केंद्र बनल्याचे समोर आले. महसूल गुप्तचर संचालनालयाने संघटित सोन्याच्या तस्करीविरोधात एक मोठी मोहीम राबवून एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल 37.74 कोटी रुपये किमतीचे 29.37 किलो सोने जप्त करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 26 तस्करांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्यामध्ये 25.10 किलो सोन्याच्या लगडी आणि 4.27 किलो सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

8 एप्रिल रोजी नैरोबीहून येणाऱ्या महिला वाहकांच्या एका मोठ्या गटाद्वारे सोन्याची (Gold) तस्करी केली जाणार असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विमानतळावर कडेकोट पाळत ठेवण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास संशयित प्रवाशांचा गट 'ग्रीन चॅनेल'च्या दिशेने जाऊ लागला, मात्र तिथे तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना पाहताच त्यांनी आपली दिशा बदलण्याचा प्रयत्न केला.

संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. यापैकी 25 प्रवाशांनी आपली ओळख सांगितली, तर एका प्रवाशाला बनावट पासपोर्ट वापरल्याप्रकरणी आधीच ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला सर्व प्रवाशांनी आपल्याकडे काहीही बेकायदेशीर नसल्याचा दावा केला, मात्र कसून तपासणी केली असता तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

तपासणीदरम्यान दोन प्रवाशांच्या बुटांमध्ये लपवून ठेवलेल्या सोन्याच्या लगडी सापडल्या. ही चोरी पकडली जात असल्याचे लक्षात येताच काही प्रवाशांनी सामानाच्या पट्ट्याजवळ काळ्या टेपमध्ये गुंडाळलेल्या वस्तू फेकून देण्यास सुरुवात केली. डीआरआयने अशा प्रकारचे अनेक पाऊच जप्त केले, ज्यामध्ये वितळलेले सोने भरलेले होते. विशेष म्हणजे, फेकलेल्या या सोन्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नव्हते.

या संपूर्ण कारवाईनंतर डीआरआयने सर्व 26 आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आंतरराष्ट्रीय तस्करीचे हे जाळे नेमके कुठे पसरलेले आहे आणि यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई मानली जात असून यामुळे सोन्याची तस्करी करणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. डीआरआयच्या या तत्परतेमुळे 37 कोटींचे सोने सरकारी तिजोरीत जमा झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT