महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर राज्यातील तुरळक भागात जोरदार पावसाचा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

सततच्या पावसामुळे धरणांतील (Dams) पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, नद्यांमध्ये (Rivers) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Monsoon Update: राज्यात दोन ते तीन दिवस सर्वत्र पावसाला (Rain) पोषक वातावरण असल्याने कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथील बहुतांश भागात पावसाची (Rain) शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर राज्यातील तुरळक भागात जोरदार पावसाचा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.

कमी दाबाचे पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत असून, दक्षिणेकडे कायम असून, राज्यस्थानात कमी दाबाचे क्षेत्रापासून गुजरात, शाजापूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत कमी दाबाचा क्षेत्रापर्यंत हवेत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

राजस्थान आणि गुजरात परिसरात असलेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र, तसेच समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून आँरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग, नाशिक, मराठवाड्यात जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, येथे तर विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

नद्यांना पूर

सततच्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला असून, गंगापूर धरणातून हंगामातील उच्च्यांकी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून नदीपात्रात 4 हजार 009 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी पावसाने उसंत घेतल्याने हा पाण्याचा विसर्ग 2 हजार क्युसेक्स पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमधील रामकुंड व गोदाघाटाचा संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूरात देखील पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर अले असून, जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये सतत पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून 8 हजार 512 पाणी सोडण्यात आले आहे. तसेच साताऱ्यातील कोयना धरण ओव्हरफ्लो झाले असून, यातून 50 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT