संपूर्ण देशभरात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. दक्षिण दिशेकडून उत्तर भारतात पावसाचा कहर सुरू झाला आहे. भारत हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील पाच अलर्ट जारी केला आहे. तसेच दिल्लीत पडणाऱ्या पावसामुळे येथील लोक अस्वस्थ झाले आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिति कायम आहे. येत्या 24 तासात उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात 23 जुलैपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे. तसेच पुणे(Pune) , रायगड (Raigad) आणि सातारा (satara) येथे मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दर्शविला आहे. तसेच अनेक राज्यात संततधार सुरू आहे, त्यामुळे हवामान आनंददायी झाले आहे. तथापि, लोकांना हालचाल करतांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील खुर्जा, पहासू , गाभाना, हाथरस , आग्रा, बुलंदशहर अशा विविध ठिकाणी मध्यम पाऊस पडणार आहे.
महाराष्ट्रातील जिल्ह्यात रेड अलर्ट
मुंबई हवामान खात्याने मुंबई आणि कोकण मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. रेड अलर्ट जारी करत हवामान खात्याने लोकांना आपल्या घरातच राहवर असे आवाहन कले आहे. या दरम्यान , जोरदार वारे देखील वाहू शकतात. याचा वेग ताशी 65 किलोमीटर असू शकतो.
आज देशात अनेक भागात पाऊस पडेल
भारत हवामान खात्याने (IMD) च्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू राहील. जम्मू-काश्मीर , हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक राज्यात पाण्याने पुर आला , त्यामुळे वाहतूकची भीषण कोंडी झाली आहे. तसेच दिल्लीमधील लोक सुद्धा पावसामुळे चिंतेते आले आहे.
उत्तरखंडात देखील पावसाचा जोर कायम
उत्तरखंडात सतत पाऊस पडत आहे. हवामान विभागच अंदाज आहे की , सध्या उत्तरखंडाच्या पर्वतीय राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे. यरथिल भागात पाऊस पडल्याने दरड कोसळून अनेक रस्ते बंद पडले आहेत. हवामान खात्याच्या अंदानुसार उत्तर भारतातील राज्यात 21 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज दर्शविला आहे. हवामान खात्याचा म्हणण्यानुसार पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पाऊस सुरूच राहील. तसेच उत्तर - पश्चिम भारत , पंजाब , हरियाणा, राजस्थान , उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात 21 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. यानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.