पुढील 4 ते 5 दिवसांत पाऊस येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा सक्रिय, 4 ते 5 दिवसांत अनेक भागात पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून आलेल्या या गुड न्यूजमुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळणार का ते पुढील चार दिवसांत कसा पाऊस पडतो त्यावरुन समजेल.

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) दडी मारलेल्या मॉन्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय (Active) होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तविण्यात आली आहे. पुढील 4 ते 5 दिवसांत (next 4 to 5 days) पाऊस येईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, मॉन्सूनसाठी पोषक वातावण निर्माण झाले असून, वाऱ्याचा वेग त्याची दिशा हे अनुकूल झाल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल. तर अनेक भागात मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह पाऊस पडेल.

जुनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. परंतु नंतर त्याने मोठा ब्रेक घेतला. जून महिन्याच्या शेवटापर्यंत मॉन्सूनने दडी मारलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगाऊ लागले आहे. त्यातच हवामान विभागाकडून आलेल्या या गुड न्यूजमुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळणार का ते पुढील चार दिवसांत कसा पाऊस पडतो त्यावरुन समजेल.

मुंबईसह महाराष्ट्राततील अनेक भागांत मॉन्सूनने हजेरी तर लावली आहे. गडचीरोलीत तर सुरु असलेल्या जोरदार पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मध्य, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अद्याप पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाई देखील जाणवू लागे आहे. त्यामुळे आता जुलैमध्ये कसा पाऊस पडतो हे पहाणे महत्त्वाचे आहे. बळीराजाला देखील याचीच आस लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

AI Misuse By Terrorists: जगासमोर मोठे संकट! दहशतवादी संघटना घेताहेत ‘एआय’ची मदत; सोशल मीडियावरून हल्ल्याची शक्यता

Goa Opinion: ‘कूल’ गोवा हा ‘कोल’ गोवा करून, विकासाच्या नावाखाली गोव्याचा जो विध्वंस चालला आहे त्याचे काय?

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT