Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

Money Laundering Case: नवाब मलिक यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ

मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची तुरुंग कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या तुरुंगवासाची मुदत 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मलिक यांच्या अर्जावर न्यायालयाने त्यांना तुरुंगात बेड आणि खुर्ची ठेवण्याची परवानगी दिली आहे. मलिक यांना गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाने (Ed) अटक केली होती. त्यानंतर त्यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या रिमांडवर पाठवण्यात आले होते. गेल्या महिन्यात केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली होती. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, फरार गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीनंतर ईडीने मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांची जमीन व्यवहाराबाबत चौकशी करण्यात आली. ईडीचे म्हणणे आहे की, 'चौकशीदरम्यान नवाब मलिक टाळाटाळ करत होते. त्यांनी तपासात कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही.' अलीकडेच, अंमलबजावणी संचालनालयाने अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही ताब्यात घेण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेशी संबंधित काही पुरावे तपासादरम्यान समोर आले आहेत.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) सर्व खाती पक्षाच्या इतर मंत्र्यांमध्ये विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मलिक यांच्याकडे कोणतेही खाते उरणार नाही. मलिक यांना राजीनामा देणार नसल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाने मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT