Aditya Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

टाइमपास टोळीला काम मिळालेल पाहून बरं वाटलं; आदित्य ठाकरेंची 'मनसे'वर बोचरी टीका

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे भाषण केले. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवारांनी 1999मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. (MNS is BJPs C Team taunts Aditya Thackeray)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे. आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचे आणि सेवा करण्याचे आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळाले आहे. बी टीम एमआयएम (AIMIM) आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT