Raj Thackery  Twitter
महाराष्ट्र

Loudspeaker Row: भोंग्याविरोधात मनसेचे आंदोलन सुरूच राहणार; राज ठाकरे

Hanuman Chalisa Row: मशिदींवरील भोंगे हा सामाजिक विषय आहे धार्मिक नाही.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरबाबत दिलेल्या अल्टिमेटमचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. राज ठाकरेंच्या धमकीचा परिणाम केवळ पोलिसांवरच नाही तर मशिदींवरही आज बुधवारी दिसून आला. एकीकडे सरकारकडून पोलिस बंदोबस्त वाढवला जात असतानाच अनेक मशिदींनी आज सकाळी अजानच्या वेळी लाऊडस्पीकर बंद केले. (Raj Thackery Latest News)

3 मे पर्यंत सर्व मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले होते. यानंतर कोणत्याही मशिदीत लाऊडस्पीकरवर अजान दिसल्यास मनसे कार्यकर्ते तेथे हनुमान चालीसा लावतील असेही सांगण्यात आले होते. आज पहाटे मनसे सैनिकांनी अनेक ठिकाणी लाउडस्पीकरवर हनूमान चालिसा लावण्यात आली होती. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना पत्रकार परिषद दुपारी घेण्याचे कारण सांगितले. (Hanuman Chalisa Controversy)

पुढे बोलताना ते म्हणाले, 'जे कायद्याच पालन करत नाही त्यांना मोकळीक दिली जाते. मला पोलिसांचे फोन येत आहेत. सर्वसाधारणपणे आमच्या पदाधिकाऱ्यांना मनसेसैनिकांना नोटिसा पाठवत आहे, ही गोष्ट फक्त आमच्याच बाबतीत का होत आहे असा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी अजान झाली नाही. मी त्या मशीदीमधील मोलवींचे आभार मानेन कारण त्यांना आमचा जो मुद्दा आहे तो नीट समजला आहे.'

'ज्या लोकांनी मशीदीवर भोगे लावले त्या लोकांवर राज्य सरकार कोणती कारवाई करणार हा प्रश्न माझा शासनाला आहे. मला क्रेडिटची अपेक्षा नाही. आम्ही फक्त सामाज हिताच काम केलं. मुंबईत ज्या 1005 मशिंदींवर भोंगे लावण्यात आले नाहीत त्यांच ठाकरे यांनी अभिनंदन केलं.

हा विषय सकाळच्या अजानपुरता मर्यादित नाही. दिवसभर चालणाऱ्या या प्रार्थनेला आम्ही थांबवणारच. जर त्यांनी लाउडस्पीकरवर अजान लावली तर आम्ही हनूमान चालिसा लावणारच असे ठामपणे ठाकरे यांनी सांगितले. मशिदिंना वर्षभरासाठी भोंग्यांची परवानी मिळते कशी असा सवालही त्यांनी विश्वास नागरे पाटिल यांच्याशी झालेल्या बातचितीनंतर उपस्थित केला. हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही. त्यामुळे जोवर भोंगे उतरत नाही तोवर हे आंदेलन सुरूच राहिल अशी ठाम भूमिका ठाकरे यांनी व्यक्त केली.

माझ्या हिंदूबांधवांना हेच सांगायचं आहे की, 'हा विषय एक दिवसाचा नाही जिकडे मशिदिंवर भोंगो वाजतील तिकडे दुप्पट आवाजात हनूमान चालिसा वाजवण्याचे आवाहन मी मनसे सैनिकांना करतो. पोलिसांनाही मी सांगते की मनसे सैनिकांना धरपकड करणे बंद करा. ज्या मशिदींवर अजान झाली नाही त्यांनाही मी आवाहन करतो की, त्यांनी हे सातत्य कामय ठेवा, हा विषय सामाजिक आहे राजकीय किंवा धार्मिक नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT