Abu Azmi Dainik Gomantak
महाराष्ट्र

शहर नामांतरास विरोध केल्याने मला जीवे मारण्याची धमकी - अबू आझमी

''औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला विरोध करणं आझमींना महागात पडेल''

दैनिक गोमन्तक

महाविकास आघाडीने आपल्या अखेरच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरणाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. यानंतर महाराष्ट्रातील बहूतांशी पक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र यावर सपा आमदार अबू आझमी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार अबू आझमी यांच्या कार्यालयात फोन करून अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकावणारा पुढे म्हणाला की, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणे आझमींना महागात पडेल. तसेच मी त्याला मारीन असे ही तो पुढे म्हणाला.

कुलाबा पोलिसांत तक्रार केली दाखल

आज विधानसभेच्या अधिवेशनात अबू आझमी उपस्थित असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अबू आझमी यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि अबू आझमी कुठे आहे, छातीत गोळी मारायची आहे, असे सांगितले.

यानंतर फोन करणाऱ्याने शिवीगाळ केली. ही परिस्थिती पाहता आमदार रईस शेख यांनी आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. अबू असीम आझमी यांचे स्वीय सहाय्यक कमाल हुसैन यांनी याप्रकरणी कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धारशिव

29 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या काही तास आधी, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धारशिव असे करण्यास मान्यता दिली. त्याला अबू असीम आझमी यांनी विरोध केला होता. तेव्हापासून त्याला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत होते.

एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, "कॉलरला आझमी यांच्याशी बोलायचे होते, परंतु हुसैन यांनी आम्हाला सांगितले की त्यांनी आमदारांना फोन करण्यास नकार दिला. रविवार आणि सोमवारी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन असलेल्या विधानसभेत आझमी यांनी नाव बदलाच्या मुद्द्यावर बोलू नये, असे फोनकर्त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT