महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने हे सरकार सामान्यांच्या हिताचे निर्णय घेईल असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांसाठी आपण इंधन दर कमी करणार असल्याचे सांगत महाराष्ट्रातील इंधनावरील व्हॅट लवकरच कमी करणार असल्याची घोषणा केली आहे. (cm Eknath Shinde announce Maharashtra govt reduce vat on fuel )
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाणार असल्याची माहिती सभागृहात दिली. नुकत्याच झालेल्या बंडखोरीच्या दिवसांची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, "गेल्या 15-20 दिवसांपासून शिवसेनेचे 40 आमदार आणि 11 अपक्ष आमदार, असे एकूण 50 आमदार माझ्यासोबत आहेत. एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस दाखवले. या सर्वांचे आभार असे ही ते म्हणाले.
तसेच आजही मी मुख्यमंत्री म्हणून या सभागृहात बोलतो आहे. यावर माझा विश्वास बसत नाही असे शिंदे म्हणाले. तसेच बंडाच्या कारणांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, "विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी माझ्याशी ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली, ती अनेक आमदारांनी पाहिली होती. आणि त्यानंतर सर्वजण एकत्र फिरू लागले.
त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. उद्धव ठाकरेंचा फोन आला- कुठे चालला आहात, असे विचारत मी सांगितले, मला माहीत नाही. त्यांनी विचारले की तू कधी येणार आहेस, मी म्हणालो की मला माहित नाही” तसेच आपला भूतकाळ आठवून शिंदे खूप भावूक झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.