Arrest Dainik Gomantak
महाराष्ट्र

कॉलेजला जाते म्हणून बाहेर पडली अन् परतलीच नाही; दोन महिन्यांनी आढळाला 17 वर्षीय मुलीचा मृतदेह, कुडाळच्या तरुणाने दिली खुनाची कबुली

Sindhudurg Crime News: कुडाळ – घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ०२ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती.

Pramod Yadav

सिंधुदुर्ग: दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. गोठोस, मांडशेतवाडी येथील तरुणाला कुडाळा पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कुडाळ – घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती.

कृणाल कृष्णा कुंभार (२२, रा. गोठोस, मांडशेतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने ०६ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुडाळ – घावनळे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ०२ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाली होती. कॉलेजला जाते असे सांगून घरातून ती बाहेर पडली होती.

मुलगी घरी माघारी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार ०३ ऑगस्ट रोजी कुडाळ पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपासचक्रे गतीमान केली होती.

याप्रकरणी मुलीच्या मित्रपरिवाराची देखील चौकशी सुरु करण्यात आली. यात संशयित कृणालवर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीअंती अखेर त्यांनी खूनाची कबुली दिली.

संशयिताला अटक करुन पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेत मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी घेऊन जात, मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, त्याला ०६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT