बायबल, कुराण आणि श्रीमद्भगवद्गीतेचा संदेश देऊन गांधी जयंती साजरी; गोव्यात सर्वधर्म समभावाचे दर्शन, CM सावंतांची हजेरी

Gandhi Jayanti 2025: गोव्यात मोठ्या उत्साहात महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
Gandhi Jayanti celebration Goa
Mahatma GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

ओल्ड गोवा: गोव्यात महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ओल्ड गोवा येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून अभिवादन केले. यावेळी बायबल, कुराण आणि श्रीमद्भगवद्गीतेतील सर्वधर्म समभावाचा संदेश धर्मगुरुंकडून देण्यात आला.

“स्वच्छ भारत ते कौशल्य भारत हे गांधींनी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. देशातील युवकांनी स्वच्छ आणि कौशल्य भारतासाठी समोर यावे”, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.

“माझे घर या योजनेचे येत्या शनिवारी शुभारंभ होत आहे. याचा राज्यातील अनेक नागरिकांना फायदा होणार आहे. यामुळे लोकांना हक्काचा निवारा मिळणार आहे. तसेच, हॅप्पीनेस इंडेक्स वाढण्यासाठी मदत होणार आहे”, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Gandhi Jayanti celebration Goa
Chodan Madel Panchayat: चोडण-माडेल पंचायतीचा कारभार महिनाभर ठप्प, पंचायत सचिव देईना नव्या सचिवाकडे ताबा

“गावाचा विकास म्हणजे गोव्याचा विकास, गावाची स्वच्छता म्हणजे गोव्याची स्वच्छता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी गोव्याला स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, यासाठी सरकार आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, स्थानिकांनी देखील यासाठी प्रयत्न करायला हवेत”, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

Gandhi Jayanti celebration Goa
Government Employee Holidays: सरकारी, बँक कर्मचाऱ्यांसाठीच्‍या आगामी वर्षातील सुट्ट्या जाहीर; सर्वसामान्‍य प्रशासन खात्‍याकडून अधिसूचना जारी

"गोव्यासारख्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज्यात स्वच्छता राखून ठेवली पाहिजे. स्वच्छ, स्वंयपूर्ण गोवा करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. गोव्यात समान नागरी कायदा पाळला जातो, गांधी जयंती हे त्याचेच प्रतिक आहे. याठिकाणी भगवत गिता, बायबल आणि कुराणातील संदेशाचे पठण करुन एकतेचा संदेश देण्यात आला, हीच गोव्याची मोठी शक्ती आहे", असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

सर्वधर्म समभाव राखणारे गोवा हे राज्य आहे. पण, काहीजण राजकारणासाठी नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तसे करु नये, असेही मुख्यमंत्री सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Political Reservation
Rahul Gandhi On CJP NEET Paper Leak Protest
Goa Crop Loss Compensation
Goa Warkari Tradition History Before Portuguese
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com