Minister Prajakt Tanpures  dainikgomantak
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री अडचणीत, ईडीकडून प्राजक्त तनपुरेंची मालमत्ता जप्त

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या रडारवर

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी सरकार विरूद्ध ईडी असा सामना पहायला मिळत आहे. याच्या आधी महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने ईडीला प्रश्न विचारत सळो की पळो केलं होतं. यात नवाब मलिक यांचा मोठा वाटा होता. पण आता ईडी रिचेबल झाली असून आता पर्यंत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या विकेटा घेतल्या आहेत. आता ईडीच्या रडारवर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री आला असून यांच्यावरही ईडीने कारवाई करत त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे असे मंत्र्यांचे नाव असून त्यांच्याकडून एकूण 13 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे. तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे. (Minister Prajakt Tanpures property seized by ED)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी, राम गणेश गडकरी साखर कारखाना अत्यंत कमी भावात आणि कोणतीही प्रक्रिया पूर्ण न करता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 26 कोटी 32 लाख रुपये किंमत असलेला हा कारखाना तनपुरे यांच्या में. प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो प्रोडक्टला फक्त 12 कोटी 95 लाखाला विकण्यात आला. याची खरेदी रक्कम 52 दिवसात भरणे बंधनकारक असताना 2010 मध्ये ही रक्कम भरण्यात आली. त्यानंतर हा खरेदी व्यवहार पूर्ण झाला, असा दावा ईडीने (ED) केला आहे. त्यामुळे तनपुरे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे.

कारवाईनंतर तनपुरे नॉट रिचेबल

नागपुर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 90 एकर जमीन तर अहमदनगर येथील 4.6 एकर जमीन ईडीने जप्त ‌करत कारवाई केली. या कारवाई नंतर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे नॉट रिचेबल झाले आहेत.

कंपनीने मांडली बाजू

ईडीची (ED) कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे नॉट रिचेबल झाले आहेत. मात्र, आज प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने स्वत: पुढे येत बाजू मांडली आहे. यावेळी वांबोरी येथील साखर कारखान्याचे व्यवस्थापक विकास आभाळे यांनी, ‘आम्ही काहीही चुकीचे केलेलं नाही. यातून बँकेचाही तोटा झालेला नाही. त्यामुळे आमच्याविरूद्ध झालेल्या कारवाईसंबंधी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल,’ असे यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

SCROLL FOR NEXT