Phone tapping Case : 'फोन टॅपिंग'साठी रश्मी शुक्लांनी शासनाची घेतली नव्हती परवानगी

Phone tapping Case : रश्मी शुक्लांनी परवानगी न घेताच केले 'फोन टॅपिंग'
rashmi shukla
rashmi shukladainikgomantak
Published on
Updated on

पुणे : तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी अंमली पदार्थाच्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे कारण सांगून परवानगी न घेताच 'फोन टॅपिंग' केल्याचे समोर येत आहे. त्यांनी 'फोन टॅपिंग'साठी अपर मुख्य सचिव गृह यांच्यासमोर ग्राहक अर्ज आवेदन पत्र प्रस्तूत केलेले नाही. तसेच मोबाईल वापरकत्यांची नावे सुद्धा 'फोन टॅपिंग'साठी व फेर 'फोन टॅपिंग'ची मंजुरी घेताना सादर केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. (rashmi shakla did not seek government permission for telephone tapping)

पुणे पोलीस आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन खासदार नाना पटोले, संजय काकडे, आमदार बच्चु कडु, आशिष देशमुख यांचे मोबाईल नंबर अनिष्ट राजकीय (Political) हेतूने जाणीवपूर्वक फसवणूक करुन 'फोन टॅपिंग'साठी घेतले. तर 'फोन टॅपिंग'साठी सुरूच ठेवले. त्यामुळे रश्मी शुक्ला व इतरांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 'फोन टॅपिंग'साठीचे (Phone) मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर आणि नागपूर शहर यांच्याकडील प्रस्ताव हे अपर मुख्य सचिव गृह (Additional Chief Secretary Home) यांच्याकडे पाठविले जातात

rashmi shukla
Weather : महाराष्ट्रात तापमानाचा पारा 35 अंशाच्याही पुढे

त्यनंतर पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांच्या समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीतील सर्व पोलीस आयुक्तालयातील फोन टॅपिंगची पडताळणी केली. त्यात पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police) २०१७ ते २०१८ या कालावधीत ४ लोकप्रतिनिधींचे ६ मोबाईल टॅपिंग (Mobile tapping) करण्यात आल्याचे आढळून आले.

rashmi shukla
Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, म्हणाले...

यावेळी पडताळणीत नाना पटोले, बच्चु कडु व आशिष देशमुख हे अंमली पदार्थाच्या (drugs) अवैध विक्रीत गुंतलेल्या व्यक्ती असल्याचे नमूद करुन महाविद्यालयीन (College) विद्यार्थ्यांना (students) अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे कारण सांगून फोन टॅपिंग केले. तर संजय काकडे हे कुख्यात गुंड बापू नायर टोळीचा सदस्य असल्याचे दाखवण्यात आले होते. काकडे यांच्यावर अनाधिकाराने जमीन बळकाविणे, खंडणी, दरोडा असे गुन्हे असल्याचे सांगण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com