Health  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra आरोग्य खात्यात मेगा भरती, दहा हजारांहून अधिक जागा भरणार

ठाकरे सरकाच्या काळात आरोग्य भरती ऐनवेळी रद्द करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Maharashtra News: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Govt) आरोग्य खात्यात मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत 10,027 हजार जागांची भरती केली जाणार आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. ठाकरे सरकाच्या काळात आरोग्य भरती ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने नव्या भरतीची घोषणा केली आहे.

राज्य सरकारकडून नुकतीच 75 हजार सरकारी नोकर भरतीची घोषणा केली आहे. त्यात आता आरोग्य विभागाकडून भरतीची घोषणा करण्यात आलेल्या युवा वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 1 ते 7 7 जानेवारी दरम्यान आरोग्य विभागाची भरतीची जाहीरात निघणार आहे. 25 ते 30 जानेवारी अर्ज करता येतील. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अर्जाची छाननी तर 25 आणि 26 मार्च रोजी परीक्षा होईल. 27 एप्रिलपर्यंत उमेदवार निवड होणार आहे.

आरोग्य खात्यातील पदाची भरती परिक्षा राज्यात सर्वत्र एकाच दिवशी घेतली जाईल. अशीही माहिती समोर आली आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT