Maharashtra News: संजय राऊत, अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच

कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती.
Maharashtra News: संजय राऊत, अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच
Published on
Updated on

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) मागील काही दिवसांपासून कारागृहात आहेत. दिवाळीपूर्वी संजय राऊत यांना दिलासा मिळाला नसून, त्यांना कारागृहातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. तसेच, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना देखील दिलासा मिळाला नसून त्यांची देखील दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे राऊत यांचा कारागृहातील मुक्काम 13 दिवसांनी वाढला आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती. तर, अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

Maharashtra News: संजय राऊत, अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच
Eknath Shinde यांच्याकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट, भूविकास बँकेच्या थकबाकीदारांचे कर्ज माफ

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.

दरम्यान, दोघांनाही न्यायालयाकडून दिलास मिळाला नसल्याने त्यांना दिवाळी तुरूंगातच साजरी करावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com