CM Eknath Shinde welcomes Vande Bharat Express at CSMT Dainik Gomantak
महाराष्ट्र

Goa-Mumbai Vande Bharat: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे CSMT वर ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रवाशांना दिली मिठाई आणि गुलाबाचे फुल

Akshay Nirmale

Grand welcome of Goa-Mumbai Vande Bharat at CSMT: गोव्यातील मडगाव ते मुंबई या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आज, मंगळवारी 27 जूनपासून सुरूवात झाली आहे. दरम्यान, ही एक्सप्रेस मुंबईत पोहचली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर या रेल्वेचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले आहे.

ढोल-ताशांच्या गजरात या रेल्वेचे या स्थानकावर स्वागत झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या रेल्वेस्थानकावर येऊन या गाडीचे स्वागत केले. त्यांनी काही प्रवाशांची विचारपुसही केली. तसेच प्रवासाच्या अनुभवाबाबत विचारले. यावेळी प्रवाशांचे गुलाबाचे फूल आणि मिठाई देऊन देऊन स्वागत करण्यात आले.

वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वेसेवा विमानातील सेवेप्रमाणे आहे. या गाडीसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार. त्यांनी महाराष्ट्राला पाच वंदे भारत एक्सप्रेस दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार. या रेल्वेचा फायदा नागरिकांना होणार आहे.

कोकणवासीयांना होणार आहे. चाकरमान्यांना होणार आहे. या रेल्वेमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी भावना या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री दीपक शिंदे, मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Resources Department : राज्यातील बेकायदेशीर बोअरवेल्स जूनपासून होणार 'सील; जलस्रोत खात्याकडून सर्व्हे सुरू, मंत्री सुभाष शिरोडकरांची माहिती

Shani Gochar 2026: शनिश्चरी अमावस्येनंतर शनी पालटणार नशीब! 'या' 5 राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार, रखडलेली कामे मार्गी लागणार

Goa High Court: ‘खुली सुधारसंस्था’ सुरू करा! न्यायालयाचे सरकारला निर्देश; पुढील सुनावणी जूनमध्ये

Goa Waste Management : कुडचडेत युवकांचा एल्गार! घातक कचऱ्याची वाहतूक रोखली; दोन डंपर पोलिसांच्या स्वाधीन

Goa Hotel Labor Shortage: हॉटेल व्यवसायाला कामगार टंचाईचे ग्रहण! ऐन सीझनमध्ये मालकांसमोर 'वेटिंग'चं मोठं संकट, व्यावसायिक हवालदिल

SCROLL FOR NEXT