ICICI Bank Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राची राजभाषा भाषा मराठी आहे म्हणत, मनसेचा ICICI बँकेला दणका

मनसैनिकांनी महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे गुजराती नव्हे, असं म्हणत बॅंकेला इशारा दिला असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यामध्ये मराठी भाषेचाच वापर करण्यात आला पाहिजे म्हणून मनसैनिक पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आक्रमक झाले आहेत. दरम्यान मनसेने आयसीआयसीआय बॅंकेला (ICICI Bank) इशारा दिल्यानंतर मराठी भाषेत सूचना फलक लावण्यास सांगितले आहे. यापूर्वी देखील या बॅंकेने गुजराती भाषेचा सूचना फलक लावले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे गुजराती नव्हे, असं म्हणत बॅंकेला इशारा दिला असल्याची माहिती मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिली आहे. मनसेने याआगोदर देखील दादरमधील (Dadar) दुकानांवर असणाऱ्या गुजराती भाषेतील (Gujarati language) फलक हटवले होते. दादरमधील ख्यातनाम ज्वेलर्सवर आणि माहिममधील एका हॉटेलवर मनसैनिकांनी धडक दिली होती. आता पुन्हा एकदा मनसैनिक मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक झाले आहेत.

शिवाय, मागील वर्षी मराठीच्या मुद्यावरुन मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अ‍ॅमेझॉनला नमती भूमिका घ्यावी लागली होती. अ‍ॅमेझॉनने आपल्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती यावेळी चित्रे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. यासोबतच अ‍ॅमेझॉनकडून मनसेप्रमुख राज ठाकरेंची दिलगिरी व्यक्त केल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सीबीडीटीच्या आरोपींना सशर्त जमीन मंजूर

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Eco Sensitive Zone: ‘जैव संवेदनशील’ क्षेत्रांची पाहणी आजपासून; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, डॉ. पांडेही होणार सहभागी

Goa Cabinet: फडणवीस कि पुन्हा शिंदे? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे गोवा मंत्रिमंडळातील बदल खोळंबला

Tanvi Vasta Arrest: 'तन्‍वी' प्रकरणाची व्याप्ती 'मोठी'! आणखी दोन तक्रारी दाखल; Social Media वरची पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT