रायगडमध्ये मुसळधार पाऊस; पुल वाहुन गेल्याने एकाचा मृत्यू

रविवारी सकाळपासूनच रायगड (Raigad) जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू झाला होता.
Heavy Rain in Raigad
Heavy Rain in RaigadDainik Gomantak
Published on
Updated on

सोमवारी रायगड (Raigad) जिल्ह्यात पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावल्याचे पहायला मिळाले आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून, 88 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, तसेच तालुक्यात 24 तासांत ३४८ मिमी पाऊस झाला. पावसाच्या या तडाख्यामुळे काशिदमधला पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक ड्रायव्हर वाहून गेल्याचे समजते आहे. तसेच राजपूरी आणि कळवटेमध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे. तसेच उसरोली नदीला देखील पूर आला असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणुन सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. (Heavy rains in Raigad)

Heavy Rain in Raigad
Lockdown Impact: असे आणखी किती अरबाज खान तयार होतील?

रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पाऊस सुरू झाला होता. किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडत असुन मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला पावसाने झोडपुन काढल्याचे पहायला मिळाले आहे.

मुरुडमध्ये 348 मिमी, श्रीवर्धनमध्ये 210 मिमी, माथेरानमध्ये 214 मिमी आणि तळा येथे 131 मिमी पाऊस झाला असल्याचे समजते आहे. रविवारी रात्री मुरुड तालुक्यात मुसळधार पावसामुळे अलिबाग मुरुड मार्गावरील जुना पूल वाहून गेला. धक्कादायक म्हणजे पुलावरील वाहनेही यावेळी वाहून गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com