Maratha Aarakshan Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: मराठा आंदोलनाचा यशस्वी लढा! 'आरक्षण खेचून आणलंच'- मनोज जरांगे पाटील यांचे वक्तव्य

Maratha Aarakshan: मराठा समाजाने खूप संघर्ष केला आज त्याचा विजय झाला असेही मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Maratha Aarakshan: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू होते. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्याने मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.

आता मोठा जनसमुदाय मुंबईत पोहचला असताना सरकारने अध्यादेश काढत मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच, हा अध्यादेश मुख्यमंत्र्याच्या हातून स्विकार करणार असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, आरक्षणात अडथळा आल्यास पुन्हा लढण्यास तयार राहू, कितीही ट्रॅप रचा पण आम्ही मागे पडणार नाही, मराठा समाजाने खूप संघर्ष केला आज त्याचा विजय झाला असेही मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

मागण्या मान्य झाल्याच्या घोषणेपासून मराठा आंदोलकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे विजय रॅलीत सहभागी होणार असून आपले उपोषण सोडणार आहेत.

सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळावे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशाप्रकारच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता विजयी सभेत या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, कोणत्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि मुख्यमंत्री सभेला संबोधन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

Horoscope: तुमचे नशीब उजळणार! व्यवसायात भरभराट! 'या' 4 राशींसाठी 17 नोव्हेंबरपासून चांगले दिवस

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

Goa Made Liquor Seized: सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री; 90 दारूच्या बाटल्या जप्त, दोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT