Pune Kolhapur Express AI Incident Dainik Gomantak
महाराष्ट्र

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Pune Kolhapur Express AI Incident: रेल्वे प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेला सुरुंग लावणारी एक अत्यंत किळसवाणी आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

Train AI Photo Controversy: आधुनिक तंत्रज्ञान जितके मानवी जीवनाला सोपे आणि सोयीस्कर बनवत आहे, तितकाच त्याचा गैरवापर विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून केला जात असल्याचे समोर येत आहे. यातच रेल्वे प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेला सुरुंग लावणारी एक अत्यंत किळसवाणी आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली. ट्रेनमध्ये शांतपणे प्रवास करणाऱ्या एका बुरखाधारी महिलेला कल्पनाही नव्हती की, तिच्या शेजारी बसलेला एक इसम आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने तिचे आक्षेपार्ह आणि बनावट फोटो तयार करत आहे. परंतु, वरच्या बर्थवर बसलेल्या एका सतर्क सहप्रवाशाच्या जागरुकतेमुळे या संपूर्ण विकृत कृत्याचा पर्दाफाश झाला आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी दारुच्या नशेमध्ये पूर्णपणे धुंद होता. त्याने समोर बसलेल्या बुरखाधारी महिलेचा छुप्या पद्धतीने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यानंतर मोबाईलमधील चॅटजीपीटीसारख्या एआय टूलचा गैरवापर करुन त्या महिलेचे (Women) कपडे हटवून तिचे बनावट अश्लील फोटो तयार करण्याचा प्रयत्न तो करु लागला. त्याचवेळी वरच्या बर्थवर बसलेल्या सहप्रवाशाने खाली बसलेल्या या इसमाची संशयास्पद हालचाल पाहिली.

हे किळसवाणी कृत्य लक्षात येताच, त्या प्रवाशाने घाबरुन न जाता किंवा थेट वाद न घालता अत्यंत हुशारीने काम घेतले. त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन भक्कम पुरावा तयार केला आणि तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. आरोपी नशेत असल्याने तो स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवू शकतो, याची पूर्वकल्पनाही त्याने पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित बोगी गाठली. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा मोबाईल जप्त केला. पोलिसांना मोबाईलमधील ओपन असलेल्या एआय ॲपमध्ये अश्लील चॅट आणि तयार केलेले बनावट फोटो स्पष्टपणे आढळून आले. भक्कम पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली.

या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांमधून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विकृत मनोवृत्तीच्या लोकांच्या हातात एआय तंत्रज्ञान जाणे किती घातक ठरु शकते, यावर आता गंभीर चर्चा सुरु झाली आहे. एआयच्या अशा भयानक आणि बेकायदेशीर वापराविरोधात कठोर कायदे करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे, कोणत्याही भीतीविना या विकृतीविरोधात आवाज उठवून पोलिसांना माहिती देणाऱ्या आणि पुरावे गोळा करणाऱ्या त्या धाडसी सहप्रवाशाचे संपूर्ण देशातून कौतुक केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT