CM Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mahayuti Manifesto: लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् बरचं काही... महायुतीचं दहासूत्री संकल्पपत्र जाहीर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीने संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे.

Manish Jadhav

Mahayuti Manifesto For Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीने संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे. हे संकल्पपत्र राज्यातील सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून दीड हजारांवरुन वाढवून 2100 केले जातील, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

अंगणवाडी सेविकांचे पगार वाढणार

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी कृषी कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत 12 ​​हजारांवरुन 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले असून एमएसपीवर 20 टक्के सबसिडी देण्याची घोषणाही केली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

महायुतीच्या 10 गॅरंटी

लाडली बहीण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस दलात तैनात करण्याचे आश्वासन दिले आहे.

कर्जमाफी आणि किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 15 हजार रुपये मिळतात, पूर्वी ही रक्कम 12 हजार होती. याशिवाय, एमएसपीवर 20 टक्के सबसिडी देण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.

वृद्ध पेन्शन धारकांना 1500 वरून 2100 रुपये मिळणार.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे.

25 लाख रोजगार निमिर्ती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार.

राज्यातील ग्रामीण भागात 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार.

अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये पगार आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन देण्यात आले असून त्यांचे मासिक वेतन 15,000 रुपये करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

वीज बिलात 30 टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.

सरकार स्थापनेनंतर 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘सादर केले जाणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Goa Politics: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT