Mahavikasaghadi will form the government in 2024 in Maharashtra Jitendra Awhad says message of Sharad Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 2024 मध्येही महाविकास आघाडीच, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पवारांच्या मनातलं

कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता युती सरकारशिवाय पर्याय नाही.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दावा केला आहे की 2024 मध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पुन्हा एकदा निवडणुका जिंकेल आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली असून कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता युती सरकारशिवाय पर्याय नाही.(Mahavikasaghadi will form the government in 2024 in Maharashtra Jitendra Awhad says message of Sharad Pawar)

महाराष्ट्रात वर्षानुवर्षे एका पक्षाचे सरकार नाही. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) एकत्र येण्याची गरज आहे. एमव्हीएचे शिल्पकार शरद पवार यांनी कधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणत्याही मुद्द्यावर दबाव आणला नाही आणि आम्हाला त्यांचा योग्य सन्मान द्या आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या असे सांगितले आहे हे देखील जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करताना आव्हाड म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारला डेटा द्यावा लागेल. या मुद्द्यावर ते राजकारण करत आहेत आणि महाराष्ट्राच्या 51 टक्के लोकसंख्येच्या ओबीसींनी पुढे जावे असे केंद्राला वाटत नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून देशात देखील भाजपच्या विरोधात राष्टवादीचे राज्यातले अनेक नेते आक्रमक होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यकारिणीच्या चर्चेबाबत नेते नवाब मलिक यांनी देशात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. यादरम्यान नवाब मलिक यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्यासाठी काम करतील, ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संयुक्त पुरोगामी आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे. शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी पक्षाची ही महत्त्वाची बैठक झाली होती.

तिसरी आघाडी नसून केवळ सत्ताधारी आणि विरोधक असतील, असे नवाब मलिक यांनी नमूद केल्याचे उल्लेखनीय आहे. यासोबतच भाजपच्या विचारसरणीविरोधात आमच्यासोबत एकजुटीने लढण्यास तयार असलेल्या सर्वांना एकत्र आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेस देखील यूपीएचा एक भाग राहिली आहे. यावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार विरोधक निर्माण केल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT