Maharashtra Cold Wave Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज!

Maharashtra Weather: राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचाअंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

यंदा महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून सर्वत्र तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली आले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो की मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. तसेच लहान मुले शाळेत जाताना उबदार कपडे परिधान केल्याचे दिसून येत आहे. आणि तसेच व्यायाम असेल किंवा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा (Cold Wave) अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक,पुणे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई-पुण्यात अनेक ठिकाणी थंडीत वाढ

दररोजच्या दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांनाही (Mumbai) थंडीचा अनुभव घेत आहे. मुंबईच्या हवेत गारवा जाणवू लागला आहे. शहरातील किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. कर्जतमध्ये 14 अंश सेल्सिअस तर लोणावळ्यात 13.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुण्यातील तळेगाव स्टेशनवर 10 अंश सेल्सिअस इतकी कमी तापमानाची नोंद झाली. पुण्यातील पाषाणमध्ये किमान तापमान 8.7अंश सेल्सिअस, अहमदनगर 9.8, राहुरी 9.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातीलच धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमान सध्या कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तापमान सात अंशावरती आले असून या वाढत्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. यासोबतच पुढील काही दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्राचा पारा देखील आणखी घसरणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT