Ganesh Festival Celebration
Ganesh Festival Celebration Dainik Gomantak
महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली जाहीर; यंदाही...

दैनिक गोमन्तक

मुंबई: महाराष्ट्र(Maharashtra )राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus) येण्याच्या भितीसोबतच आता डेल्टा प्लसचेही रूग्ण वाढत आहे. त्यामुळे राज्यात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहे. त्यातच महाराष्ट्राचे लाडके गणपती बप्पा म्हणजे गणेशोत्सवाचे (Ganpati festival 2021)आगमन लवकरच होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे. 'यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा' असे आवाहन राज्य सरकारकडून नागरीकांना करण्यात आले आहे.(Maharashtra State Government has appealed to the citizens to celebrate Ganesh Festival simply)

आज गृहविभागाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. यामध्ये मागील वर्षीप्रमाणेच नियम लागू करण्यात आले आहे. गणेश मंडपात गर्दी टाळण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले आहे. गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित असणार आहे. तसेच, सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची 2 फूट असावी, अशा सूचनाही राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी नवी नियमावली

  • 1) गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित आहे, शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. नागरिक देतील ती वर्गणी मंडळाने स्विकारावी, सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

  • 2) आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.

  • 3) श्रीगणेशाच्या मूर्तीची सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटांची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

  • 4) शक्यतो यावर्षी मातीच्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तीऐवजी घरातील मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी जावून विसर्जन करावं.

  • 5) गणेशोत्सवात देणगी अथवा वर्गणी स्वईच्छेने कोणी देत असेल तरच ती स्वीकारावी जबरदस्ती करू नये. तसेच गणेशोत्सवात जाहिरातींमुळे नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर इतर जाहिरातींपेक्षा आरोग्यविषयक जाहिरातींना प्राधान्य देण्यात यावं

  • 6) विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरे आणि आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर द्यावा. तसेच यामाध्यामतून डेंग्यू, मलेरिया, कोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

  • 7. राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain चे नियम कायम राहतील. गणेशोत्सवा दरम्यान यामध्ये कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही.

  • 8. त्याचबरोबर आरती, भजन, किर्तन असा धार्मिक कार्यक्रमांत गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम आणि तरतूदींचं काटेकोर पालन करण्यात यावं.

  • 9. श्रीगणेशाच्या दर्शनाची ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

  • 10. शासनाने आखून दिलेल्या त्रिसुत्रीनियमांचे पालन करावे

  • 11 गणपतींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार नाही. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढू नये.

  • 12 महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

Loksabha Election 2024: काँग्रेस उमेदवार विरियातो यांच्या समर्थक महिलेने पैसे वाटल्याची तक्रार

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

SCROLL FOR NEXT